क्रूरतेचा कळस! निराधार योजनेचं अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंध महिलेचा कारकुनाकडून विनयभंग


Khalapur News: खालापूर येथे एका दिव्यांग अनुसूचित जातीतील महिलेचा कारकुनाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Blind woman molested by clerk trying to get gov benefit
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड, अमुलकुमार जैन: सध्या खालापूरमधील एका घटनेने खळबळ उडाली आहे. एका दिव्यांग महिलेबरोबर तहसील कार्यालयातील एका कारकुनाने अश्लील वर्तन केले आहे, ही महिली अनुसूचित जातीमधून येते. तिच्या दिव्यांग असण्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानासाठी खालापूर तहसील कार्यालयात गेलेल्या एका दिव्यांग व अनुसूचित जातीतील महिलेला कारकूनाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात संबंधित कारकुनाविरोधात भारतीय न्याय संहिता व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला डोळ्यांनी अधू असून तिला संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा अनुदान मिळायचे. मात्र डिसेंबर २०२४पासून अनुदान थांबले होते. ते परत मिळावे यासाठी अनेक ठिकाणी चौकशी केली. त्याचदरम्यान तिने ऑगस्ट २०२५ मध्ये खालापूर तहसील कार्यालयातील संबंधित विभागातही चौकशी केली. तेव्हा संबंधित कारकुनाने तिला दोन ठिकाणांहून लाभ घेता येत नाही, अशी चुकीची माहिती दिली. या प्रकारामुळे त्यानंतर महिला शिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात गेली.
Maharashtra Timesमुलाची ओळख दाखवत सेवानिवृत्त शिक्षकाला दिवसाढवळ्या चोरट्यांनी लुबाडलं, धक्कादायक घटनेनं खळबळ
पाठपुरावा करत असताना १७ ऑक्टोबर २०२५ रोजी ती पुन्हा कागदपत्रांसाठी याच कार्यालयात पोहोचली असता, कारकुनाने तिला विनाकारण संध्याकाळपर्यंत थांबवले. एवढेच नव्हे तर नंतर कार्यालयाजवळील टी-स्टॉलवर चहा प्यायला बोलावून, “मिठी मार” असे विकृत आदेश दिले. यावेळी त्याने या दिव्यांग महिलेच्या पायाला पाय लावला, गुडघ्याला स्पर्श केला आणि तिच्यावर बळजबरी करणयाचा प्रयत्न केला. तो हे अश्लील वर्तन करत इतक्यावरच न थांबता, १९ ऑक्टोबर रोजी खोपोली येथे भेटायला बोलावले. कारकुनाने तिला खंडाळा येथे फिरायला चल असेही म्हटले आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

बीडमधील आरोपी शिक्षक संदीप क्षीरसागरांचा राईट हँड; बजरंग सोनवणेंचं धनंजय मुंडेंना उत्तर

दरम्यान, या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून IPC कलम ७५(२), ७५(३), ७९ तसेच अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii), ३(२)(v-a) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल करत आहेत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा