Zubair khan on Bigg boss 11: ‘मी पंख्याला लटकून…’; बिग बॉसमध्ये सलमान खाननं झाप झाप झापलं, ‘या’ कंटेस्टेंटनं केलेला स्वतःला संपवण्याचा प्रयत्न


Zubair khan on Bigg boss: 2017 साली बिग बॉसचा 11 (Bigg Boss Season 11) वा सिझन प्रचंड चर्चेत आला होता.  जुबैर खान (Zubair khan) हा या रिअॅलिटी शोचा भाग होता. त्यानं  आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा (Dawood ibrahim) नातेवाईक असल्याचं सांगितलं होतं. तसेच  हसीना पारकरचा जावई असल्याचा दावा केला होता. जुबैरने केलेले विधान हे चर्चेचा विषय बनला होता.  पण खरा धमाका तेव्हा झाला जेव्हा, जुबैरने अर्शी  खान नावाच्या कंटेस्टेंटसोबत  झालेल्या वादात अपमानास्पद  आणि असभ्य भाषेचा वापर केला होता.   यामुळे बिग बॉसच्या (Bigg boss) घरात एकच गदारोळ निर्माण झाला होता.  दरम्यान, या वादानंतर ‘विकेंड का वार’मध्ये सलमानने झुबैरला चांगलेच फटकारले.   यानंतर जुबैरच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टींमध्ये अडथळे निर्माण झाले होते. 

डिप्रेशनमध्ये गेलेला जुबैर खान, नेमकं घडलं काय? (Zubair khan on bigg boss and salman khan)

अर्शी खानसोबत झालेल्या वादानंतर जुबैर खानला ‘विकेंड का वार’मध्ये सलमान खानने चांगलंच धारेवर धरलं होतं.  सलमान खान जुबैरवर चांगलाच भडकला. या दरम्यान, सलमान खानने   जुबैरला ‘नल्ला डॉन’ असा टॅग दिला होता. नॅशनल टेलिव्हिजनवर सलमान खानने जुबैरला चांगलेच फटकारले होते.  जुबैरला सलमान खानचे शब्द टोचले. माहितीनुसार, यानंतर जुबैर डिप्रेशनमध्ये गेला असल्याची माहिती समोर आली आहे.  जुबैरची प्रकृती इतकी नाजूक झाली की, कार्यक्रमादरम्यान त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. नंतर  त्याला रुग्णालयात  दाखल करण्यात आलं.

व्होटिंग दरम्यान, कमी मिळालेल्या मतांमुळे जुबैर शोमधून एलिमिनेट झाला होता.   शोमधून बाहेर आल्यानंतर जुबैरने सलमान खानच्या विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. बिग बॉसमध्ये जुबैरला सलमान खान म्हणाला, ‘चालता हो इथून, मी तुला सोडणार नाही. मी तुला इंडस्ट्रीत काम करु देणार नाही’ . यानंतर जुबैरला मानसिक त्रास झाला असल्याचं बोललं जात आहे.   इतकेच नाही तर, त्याच्या सोशल आणि पर्सनल लाइफमध्येही तणाव निर्माण झाला होता.

त्यानं एका मुलाखतीत आपलं दु:ख व्यक्त केलं होतं. ‘केवळ इमेज खराब झाली नाही तर, काम मिळणंही बंद झालं होतं’, असं त्यानं मुलाखतीत सांगितलं होतं. ‘बिग बॉस आणि सलमान भाऊच्या रागामुळे जे  नुकसान झाले, ते खूप मोठे होते.  मला त्यांनी नल्ला डॉन असा टॅग दिला होता. यामुळे माझी रातोरात इमेज बदलली. मला खोट्या आरोपांमध्ये फसवून  3 महिने जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं.  माझ्या आईला जबरदस्त धक्का बसला होता. 3 महिने माझ्या आईने काहीच खाललं नव्हतं. या दरम्यान, माझ्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता’.

‘मी ओढणी पंख्यावर लटकवून.. मी रोज 10 mg गोळ्या घेतो.  खरंतर या गोळ्या वेड्यांना दिले जातात. त्या 45 मिनिटांच्या एपिसोडवर अनेकांनी विश्वास ठेवला होता.  जर मी खरंच असा व्यक्ती असतो, तर कदाचित माझ्यावर बऱ्याच केसेस असतात’, असं जुबैर म्हणाला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

जान्हवी कपूरच्या सावत्र बहिणीचं लग्न पार पडलं, अर्जून कपूर झाला भावुक, लग्नातील खास क्षणाचे PHOTOs व्हायरल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *