श्रेयस अय्यरला संपर्क साधण्यासाठी मुली काय करायच्या? बहीण श्रेष्ठाने गुपित केलं उघडImage Credit source: Instagram
टी20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर सध्या टीकाकारांच्या रडारवर आला आहे. पराभवाची मालिका सुरू असल्याने त्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. असं असताना त्याची बहीण श्रेष्ठा त्याच्या पाठिमागे ठामपणे उभी राहिली आहे. त्याच्या कर्णधारपदाचा बचाव करताना तिने सांगितलं की, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या नेतृत्वातही संघाने सामने गमावले आहेत. असं असताना तरूणी भावाशी संपर्क साधण्यासाठी काय करायच्या? याबाबतचा खुलासा श्रेष्ठाने केला आहे. तरुणी श्रेयसशी संपर्क साधण्यासाठी श्रेष्ठासोबत मैत्री करायच्या, पण त्यांचा हेतू कळताच त्यांच्यापासून दूर राहायची, असं तिने सांगितलं. श्रेष्ठा अय्यरने सांगितलं की, माझा भाऊ त्याच्या मर्जीने लग्न करेल. पण त्याने मत मत विचारलं तर काय योग्य आणि अयोग्य याबाबत नक्कीच सांगेल.
श्रेयसच्या मागे कोणत्या तरूणी असायच्या?
श्रेष्ठा अय्यरने फिल्मी ज्ञानला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘माझा भाऊ श्रेयस अय्यरसाठी मला योग्य मुलगी हवी आहे. तो अर्थातच त्याच्या आवडीची मुलगी निवडेल, पण जेव्हा तो माझं मत विचारेल, तेव्हा मी त्याला सांगेन की काय बरोबर आहे आणि काय चूक. कारण फक्त एक मुलगीच दुसऱ्या मुलीला खऱ्या अर्थाने समजू शकते. काही मुलींना माझ्याशी मैत्री करायची होती, पण त्यांचा खरा हेतू श्रेयस होता. मी त्यांच्यापासून पटकन दूर झाले. दुबईतील माझ्या काही मैत्रिणीसुद्धा विवाहित आहेत, पण मला त्यांचे खरे हेतू माहीत आहेत.’
🚨🎙️ Shresta Iyer – I am very possessive. I want the right girl for my brother Shreyas Iyer.
Obviously, he will choose the girl, but when he asks for my opinion, I’ll tell him whether I think she’s the right one or not, because only a girl can truly understand another girl.… pic.twitter.com/erCOLjQNwA
— TEJASH 🚩 (@LoyleRohitFan) July 8, 2026
श्रेष्ठाने भावाच्या कर्णधारपदाची स्तुती करत त्याची पाठराखणही केली. श्रेष्ठा अय्यर म्हणाली की, ‘फक्त वाट पाहा; तो भारताच्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक बनेल. कर्णधार म्हणून तो अपयशी ठरत आहे, असे म्हणणे आपल्यासाठी सोपे आहे, पण आपल्याला संपूर्ण चित्र माहीत नाही. लोक कर्णधाराला केवळ निकालांवरूनच पारखतात. प्रत्येक भारतीय कर्णधाराने आपापल्या परीने चांगली कामगिरी केली आहे. शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, एम.एस. धोनी आणि सचिन तेंडुलकर यांनीही अनेक सामने गमावले आहेत. पण जर तुम्ही फक्त श्रेयसलाच लक्ष्य करत राहिलात, तर कदाचित समस्या दुसरीकडेच आहे.’