10 मिनिटाची भेट, कारमध्येच गेम फिरला, संजय दिना पाटील कसे गळाला लागले?; महिन्याभरापूर्वीची इन्साईट स्टोरी समोर – Marathi News | Sanjay dina patil and eknath shinde travel in one car trigger point of uddhav thackeray party ubt six mp revolt


Sanjay Dina Patil : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्वच्या सर्व खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात सामील होण्याची शक्यता आहे. भविष्यात अडचण येऊ नये म्हणून सर्व कायदेशीर बाबींचा अभ्यास करूनच शिंदे गटाकडून सहा बंडखोर खासदारांच्या प्रवेशाची घोषणा केली जाणार आहे. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे खासदार आपल्या पक्षात घेण्याचे काम करण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच ऑपरेशन टायगरवर गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरू होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खासदार संजय दिना पाटील आणि एकनाथ शिंदे यांचा एकाच कारमधून प्रवास हा त्याच ऑपरेशन टायगरचा एक भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

मे महिन्यात नेमकं काय घडलं होतं?

लवकरच ठाकरे यांचे काही खासदार हे शिंदे यांच्या पक्षात सामील होणार आहेत, अशी चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. ठाकरे यांचा पक्ष तसेच खासदार मात्र या चर्चेत काहीच अर्थ नाही, असे वारंवार सांगत होते. असे असतानाच 5 मे रोजी ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय दिना पाटील आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच कारमध्ये बसून एकत्र प्रवास केला. काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा अपघात झाला होता. त्यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरू होते. संजय दिना पाटील याच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे गेले होते. त्यानंतर शिंदे बाहेर निघाल्यानंतर संजय दिना पाटीलदेखील त्यांच्यासोबत कारमध्ये बसले होते.

तेथूनच झाली ऑपरेशन टायगरला सुरुवात?

संजय दिना पाटील आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र कारने प्रवास केल्यानंतर आता लवकरच ठाकरेंचे खासदार फुटणार असा अंदाज लावला जात होता. मे महिन्यात या दोन्ही नेत्यांनी कारमधून एकत्र प्रवास केल्यानंतर आता जून महिन्यात ठाकरेंच्या सहा खासदारांनी बंडखोरी केली. याच एकत्र कार प्रवासानंतर संजय दिना पाटील शिंदे गटाच्या गळाला लागले असावेत, असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, आता शिंदे गटाकडून या सहा खासदारांच्या प्रवेशाची नेमकी घोषणा कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *