Last Updated:
चंद्रपूरच्या जीएसटी भवन लोकार्पण कार्यक्रमात आज मोठे नाराजीनाट्य रंगले. हा कार्यक्रम उशिराने सुरू झाल्याचे कारण सांगत खासदार आणि आमदारांची भाषणे रद्द करण्यात आली.
हैदर शेख, प्रतिनिधी, चंद्रपूर : चंद्रपूरच्या जीएसटी भवन लोकार्पण कार्यक्रमात नाराजीनाट्य रंगले. उशिराने कार्यक्रम सुरू झाल्याचे कारण सांगत खासदार आणि आमदारांची भाषणे रद्द करण्यात आली. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांचे नाव न घेता हा एका आमदाराचा कार्यक्रम असल्याची टीका केली. आम्हाला बोलू द्यायचे नसेल तर शासकीय कार्यक्रमात बोलवू नका, असे सुनवायला त्यांनी मागे पुढे पाहिले नाही.
चंद्रपूरच्या जीएसटी भवन लोकार्पण कार्यक्रमात आज मोठे नाराजीनाट्य रंगले. हा कार्यक्रम उशिराने सुरू झाल्याचे कारण सांगत खासदार आणि आमदारांची भाषणे रद्द करण्यात आली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने उभारलेली इमारत असल्याने त्यांचे भाषण अपेक्षित होते. मात्र जिल्ह्याच्या राजकारणात विरोधी गटातील काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार देखील भाषणासाठी सज्ज होते.
इकडे प्रोटोकॉल नुसार कार्यक्रम व्हावा म्हणून दबाव असताना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची मात्र शटल एक्स्प्रेस झाली. कार्यक्रमात शाब्दिक विजा कडाडू शकतात हे लक्षात येताच पालकमंत्री उईके यांनी यातून मार्ग काढत केवळ उद्घाटक आणि पालकमंत्री यांचीच भाषणे घेण्याचे सूचित केले.
अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचे भाषण सुरू असताना मागे चक्क धुसफूस सुरू होती. कार्यक्रम संपल्यावर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुनगंटीवार यांचे नाव न घेता हा एका आमदाराचा कार्यक्रम असल्याची टीका केली. पालकमंत्री उईके यांचा मान म्हणून आम्ही शांत राहिलो, असे सांगत आम्हाला बोलू द्यायचे नसेल तर शासकीय कार्यक्रमात बोलवू नका असे खासदार धानोरकर यांनी सुनावले.
Chandrapur,Maharashtra
