Uddhav Thackeray: ६ खासदार गेले पण सर्वांत आधी ‘हा’ खासदार टार्गेटवर, उद्धव ठाकरेंचा प्लॅन ठरला | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Uddhav Thackeray: फुटीर खासदारांच्या विषयी ठिकठिकाणी रोष व्यक्त होत असताना पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेऊन फुटीरांविरोधात पुढील रणनीतीसाठी उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बैठकीचे आयोजन केले आहे.

उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख)
उद्धव ठाकरे (शिवसेना पक्षप्रमुख)

मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत.या मोठ्या फुटीमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, आता झालेल्या या पडझडीनंतर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. या ६ बंडखोर खासदारांपैकी एका खासदाराला सर्वात आधी टार्गेट करण्याचा मोठा प्लॅन उद्धव ठाकरेंनी आखला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ खासदारांनी जरी बंडखोरी केली असली, तरी उद्धव ठाकरे यांच्या रडारवर सर्वात आधी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आले आहेत. संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीमुळे ईशान्य मुंबईत पक्षाला गडाला खिंडार पडले आहे. त्यामुळे ठाकरे गटाने सर्वप्रथम मुंबईतील आपला गड शाबूत ठेवण्यासाठी आणि संजय दिना पाटील यांना राजकीयदृष्ट्या घेरण्यासाठी रणनीती आखली आहे.

वर्धापनदिनी महत्त्वाची बैठक, उद्धव ठाकरे जाणून घेणार पदाधिकाऱ्यांची भूमिका

संजय दिना पाटील यांच्या बंडखोरीनंतर ईशान्य मुंबई मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दुपारी १२ वाजता ईशान्य मुंबईच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. संजय दिना पाटील यांनी पक्ष सोडल्यानंतर स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहेत, हे उद्धव ठाकरे स्वतः जाणून घेणार आहेत. खासदार गेले तरी तळागाळातील कार्यकर्ता आणि मतदार पक्षासोबत कसा राहील, यादृष्टीने रणनीती आखली जाईल.

फुटीरांना मतदारसंघातच घेरण्याची तयारी

ठिकठिकाणी फुटीर खासदारांविषयी मतदारांमध्ये आणि निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना संबंधित बंडखोर नेत्यांना जाहीरपणे जाब विचारण्याचे आणि त्यांना मतदारसंघात घेरणं सुरू करण्याचे थेट आदेश देण्याची शक्यता आहे.

मुंबईतूनच डॅमेज कंट्रोलची सुरुवात, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मैदानात

शिवसेनेमधून ६ खासदार गेल्यानंतर पक्ष संपला अशी टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी थेट ग्राऊंडवर उतरून उद्धव ठाकरे डॅमेज कंट्रोल करणार आहेत. मुंबईतूनच या डॅमेज कंट्रोलची सुरुवात होत असून, संजय दिना पाटील यांना मतदारसंघातच कोंडीत पकडण्याचा ‘ठाकरे ब्रँड’ प्लॅन आता तयार झाला आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीनंतर ठाकरे गट आक्रमक पवित्रा घेणार हे स्पष्ट दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *