Smriti Mandhana: स्मृती मंधानाने आयसीसी महिला विश्वचषक 2026 मध्ये आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावले. पाकिस्तानविरुद्धच्या 68 धावांच्या खेळीनंतर, तिने बुधवारी 74 धावांची शानदार खेळी केली. नेदरलँड्सविरुद्धच्या या खेळीत तिने एक षटकार आणि 11 चौकार मारले, ज्यामुळे तिच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 600 चौकार पूर्ण झाले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 600 चौकार मारणारी ती पहिली क्रिकेटपटू (पुरुष किंवा महिला) आहे. अद्याप कोणत्याही पुरुष क्रिकेटपटूने 500 चौकारांचा टप्पा गाठलेला नाही. बुधवारी झालेल्या भारत विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारताने 209 धावा केल्या. टी-20 विश्वचषकात भारताने 200 पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ होती. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांनी पहिल्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संघ 114 धावांवर सर्वबाद झाला. भारताने हा सामना 95 धावांनी जिंकला, धावांच्या बाबतीत टी20 विश्वचषकातील भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे.
स्मृतीचे टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतील 600 चौकार
स्मृती मंधानानेही या डावात टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील आपला 600 वा चौकार पूर्ण केला. तिने आतापर्यंत 168 सामन्यांतील 162 डावांमध्ये 604 चौकार मारले आहेत. या फॉरमॅटमध्ये तिने भारतासाठी 1 शतक आणि 35 अर्धशतकांसह 4475 धावा केल्या आहेत. तिने 88 षटकारही मारले आहेत.
Smriti Mandhana is the definition of class 🔥
Hits 4 back to back fours.Just look at her timing.
So smooth🤌
Best in the world.#T20WorldCup #INDvNED #INDWvNEDW pic.twitter.com/FdNkwZmYQk— TheFakeFakeer (@TheFakeFakeer) June 17, 2026
सर्वाधिक चौकार मारणारे अव्वल 5 पुरुष क्रिकेटपटू
पाकिस्तानच्या बाबर आझमच्या नावावर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पुरुष क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक चौकारांचा विक्रम आहे, त्याने 136 डावांमध्ये 477 चौकार मारले आहेत. तो 500 चा टप्पा गाठण्याच्या जवळ आहे. यादीत रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. कोहली आणि रोहित यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
- 477 – बाबर आझम (पाकिस्तान)
- 449 – पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)
- 383 – रोहित शर्मा (भारत)
- 373 – जोस बटलर (इंग्लंड)
- 369 – विराट कोहली (भारत)
इतर महत्वाच्या बातम्या
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला