DCM Eknath Shinde, kali Diwali: काळी दिवाळी साजरी करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे गावातून उत्तर दिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी पोहोचले आहेत. त्यांचा दरे गाव दौरा नेहमीच चर्चेत राहिला आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांनी त्यांच्या मूळ गावी जात शेती केली आहे. विरोधकांनी मात्र त्यांच्यावर टीका केली होती. हेलिकॉप्टरने शेतीमध्ये जाणारे मुख्यमंत्री अशी खोचक टीका उबाठाचे नेते करत होते. दरम्यान, आज एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या काळी दिवाळी साजरी करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुद्दा नसल्यामुळे विरोधक कोणत्याही गोष्टीचे राजकारण करत आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणालेत एकनाथ शिंदे?
मी दरे गावी आलो की विरोधकांचं पोट दुखू लागतं. मी दिल्लीला गेलो की पोटात दुखतं. मी त्याचा विचार करत नाही. या सर्व पोट दुखी वाल्यांचा मी बंदोबस्त केला आहे. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत काढला आहे, असं उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत.
सफरचंदांच्या बागेत पाहणी
दरम्यान, या दोऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सफरचंदाच्या बागेत जाऊन सफरचंदाच्या झाडांचीही पाहणी केली. यावेळी स्वतः रोटर हातात घेऊन मशागत केली. यावेळी शेतात काम करत असताना त्यांच्या शेतीवर टीका करणाऱ्या विरोधकांचा एकनाथ शिंदेंनी चांगलाच समाचार घेतला आहे. Ratnagiri News: माझ्या मुलीचा खूप छळ केला, लेक गमावलेल्या आईने काय-काय सांगितलं? रत्नागिरी विवाहिता मृत्यू प्रकरणात नवी माहिती विरोधकांकडे आता मुद्दे नाहीत. पूर परिस्थितीबाबत त्यांना वाटले नव्हते बत्तीस हजारा कोटींचं पॅकेज हे सरकार शेतकऱ्यांना देईल. मी दसऱ्याच्या मेळाव्यात म्हणालो होतो, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. त्याप्रमाणे आम्ही पैसे देणे सुरू केले आहे. त्यामुळे बोलणार काय मुद्दा नाही. कुठल्याही गोष्टीचा राजकारण करायचं त्यांनी ठरवलं आहे. शेती असो किंवा निवडणूक असो विरोधक दिशाभूल करायचं काम करत असतात. चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे. हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुके देत होते. आता मात्र टीका करतात. ही दुटप्पी भूमिका आहे. हे कायमचं रडगाणं आहे. बाळासाहेबांनी आम्हाला कधीही रडायला शिकवलं नाही तर लढायला शिकवलं आहे. असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यामध्ये विविध ठिकाणी सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्याची दिवाळी चांगली नाही तर आपण दिवाळी कशी साजरी करायची अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांनी घेतली आहे. त्यांनी सरकारने फसवे आश्वासने दिले आहेत. शेतकऱ्यांना मदत करण्याजागी सरकार फक्त फसव्या घोषणा करत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यानंतर विरोधी गटाने आता काळी दिवाळी अशी मोहिम राबवली आहे. राज्यात विविध ठिकाणी काळी दिवाळी साजरी करण्यात येत आहे व निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा