विनोद तावडेंच्या भेटीनंतर थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला एकनाथ खडसे, राज्यातील राजकारणात.. – Marathi News | Eknath Khadse had arrived to meet Uddhav Thackeray photo of the meeting has gone viral


ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे विनोद तावडे यांच्या भेटीला पोहोचले होते. या भेटीचे काही फोटो पुढे आले, ज्याने खळबळ उडाली. एकनाथ खडसे भाजपात पुन्हा एकदा प्रवेश करणार यावरून विविध चर्चा या रंगताना दिसल्या. यादरम्यानच आता एकनाथ खडसे यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ खडसे उद्धव ठाकरेंच्या भेटीकरिता मातोश्रीवर दाखल झाले. ज्यामुळे आता वेगळ्या चर्चांना उधाण आले. या भेटीदरम्यान खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात एकनाथ खडसे यांनी प्रवेश केला. अनेक वर्ष त्यांनी भाजपाचे काम केले. एकनाथ खडसे यांची सून आणि भाजपा नेत्या रक्षा खडसे केंद्रात मंत्री आहे. यामुळे एकनाथ खडसे घरवापसी करणार का? यावरून विविध चर्चा या रंगताना दिसल्या.

त्यामध्येच एकनाथ खडसे थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. पण या भेटीचे कारण पुढे आले असून याबाबत एकनाथ खडसे यांनी भाष्य केले. पुढील महिन्यात अमृत महोत्सवी वाढदिवस कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याचेच निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी एकनाथ खडसे पोहोचले होते.

या भेटीचा आणि राजकारणाचा काहीच संबंध नसल्याचेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. ही भेट राजकीय नसल्याचे खडसेंनी स्पष्ट केले. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर मोठ्या अडचणीत सापडले होते. रेव्ह पार्टी करताना पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले होते. या पार्टीत काही महिला देखील सहभागी झाल्या होत्या.

पुण्यात ही पार्टी सुरू होती. बुकिंग देखील एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या नावावर होते. यावेळी एकनाथ खडसे यांची मुलगी आणि नेत्या रोहिणी खडसे थेट माध्यमांपुढे येत काही मोठे दावे केले होते. यादरम्यान पती प्रांजल खेवलकरसोबत रोहिणी खडसे खंबीरपणे उभ्या होत्या. त्या कोर्टातही पोहोचल्या होत्या. त्यावेळी संपूर्ण खडसे कुटुंबिय जोरदार चर्चेत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *