Team India : अय्यरवर खापर फुटणार की गंभीरवर? BCCI ने बोलवली तातडीची बैठक! सगळा हिशोब होणार | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

BCCI meeting After loss t20 series against England : युनायटेड किंगडमचा हा दौरा 19 जुलै रोजी संपल्यानंतर एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली जाईल. या बैठकीत केवळ संघाच्या कामगिरीवर आणि चुका सुधारण्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल.

BCCI meeting After loss t20 series against England
BCCI meeting After loss t20 series against England

BCCI Course Correction meeting : सरपंच श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय टी-ट्वेंटी संघाला आधी आयर्लंडविरुद्ध 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला आणि त्यानंतर पाच सामन्यांची इंग्लंडविरुद्धही मालिका गमवावी लागली आहे. मार्च 2026 मध्ये मायदेशात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाची ही अवस्था झाल्याने क्रीडा क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे. 19 जुलै रोजी वनडे मालिका संपून संघ परतल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यासोबत बीसीसीआयचे अधिकारी या पराभवाचे सखोल विश्लेषण करतील, अशी माहिती समोर आली आहे.

बीसीसीआयने बोलवली आढावा बैठक

या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एका निवेदनात स्पष्ट केलंय की, युनायटेड किंगडमचा हा दौरा 19 जुलै रोजी संपल्यानंतर एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली जाईल. या बैठकीत केवळ संघाच्या कामगिरीवर आणि चुका सुधारण्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले जाईल. खेळात कुठं त्रुटी राहिल्या आणि आगामी काळात कशी कामगिरी करायची, यावरच मुख्य चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

नवीन प्रयोग सध्यातरी अपयशी

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयचे निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाने संघात बदलांचे वारे आणण्यास सुरुवात केली होती. या अंतर्गत अनुभवी सूर्यकुमार यादवला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं. तर, त्यांच्या जागी वैभव सूर्यवंशी आणि प्रिन्स यादव सारख्या नवीन चेहऱ्यांना संघात संधी देऊन प्रयोग करण्यात आले. मात्र, हे नवीन प्रयोग सध्या तरी यशस्वी ठरलेले दिसत नाहीत. त्यावर देखील बीसीसीआय चर्चा करणार आहे.

लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची तयारी

दरम्यान, 2028 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियासमोर विजेतेपद टिकवणं मोठं आव्हान असणार आहे, तसेच 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी देखील टीम इंडिया सज्ज झाली आहे. या दोन्ही स्पर्धा भारताचं मुख्य लक्ष्य आहे. या बैठकीतील निर्णयांचा परिणाम 23 जुलैपासून हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध सुरू होणाऱ्या 3 मॅचच्या टी-20 मालिकेत पाहायला मिळतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *