लांडग्याची टोळी… तानाजी सावंत यांची ठाकरे गटाच्या नेत्यावर थेट टीका, म्हटले, ते.. – Marathi News | Tanaji Sawant made major statement regarding Operation Tiger


ठाकरे गटाविरोधात ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे यांनी राबवले. विशेष म्हणजे त्यांचे हे ऑपरेशन यशस्वी देखील झाले. तीन ते चार दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गटासाठी याबाबतची पत्रही दिले. हा उद्धव ठाकरे यांच्याकरिता मोठा धक्का आहे. मध्यरात्री वरूण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश मिळाले. अखेर काल ओमराजे निंबाळकर यांनी आपला निर्णय जाहीर केला. ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहण्याचे आदेश तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी दिली होती. ज्यावेळी ओमराजे निंबाळकर हे धाराशविमध्ये पोहोचत होते, त्यावेळीच ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत राहण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिली.

तानाजी सावंत आपल्या कार्यकर्त्यांसोबत ओमराजे निंबाळकर यांच्यासोबतच होते. यादरम्यान बोलताना तानाजी सावंत यांनी मोठे भाष्य केले. तानाजी सावंत यांनी म्हटले की, ऑपरेशन टायगर पूर्ण करण्यासाठी मला एकनाथ शिंदेनी सक्षम मानले. आणि मी ते सक्सेस केलं. ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे आता मला समाधान वाटत आहे. मागील 2 ते 3 महिन्यापांसून ऑपरेशन टायगर सुरु होते.

सगळं झाले होते. मात्र, माझ्या मतदार संघातला (ओमराजेचा ) विषय मागे पुढे होत होता. ऑपरेशन टायगरचे चित्र आता स्पष्ट झालेले असून आता शिवसेनेची ताकद वाढलेली आहे. एकनाथ शिंदे डाॅक्टर जरी नसले तरी डाॅक्टरांना जे ऑपरेशन जमत नाही. ते एकनाथ शिंदे चांगल्या पध्दतीने करतात.  संजय राऊताचे कामच आहे, ओरडंण. आमच्या खासदारांना सुरक्षा घ्यायची गरजच नाही.

मराठवाडा-विदर्भ भागाच्या विकासाची दृष्टी घेऊन खासदार आमच्यासोबत आलेत. सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांच्यावर बोलताना तानाजी सावंत यांनी म्हटले की, लांडग्याची टोळी आहे.  माणुस आप आपल्या औकातीप्रमाणे संस्कृती प्रमाणे बोलत असतो. लांडगा, गिंधाड म्हणणे ही त्याची संस्कृती आहे. आमची विकासाची भाषा असेल.

मंत्रिपदाबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे माझ्या मंत्री पदाबद्दल ठरवतील. मला त्यांनी दिलेली जबाबदारी यशस्वी पार पाडली. खासदार फुटले आता ठाकरेचे आमदार फोडले जाणार का ? या प्रश्नावर तानाजी सावंतानी बोलणे टाळले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *