राजेश खन्ना यांनी स्वत:च दिलं मृत्यूला आमंत्रण, दिवसभर ढसाढसा रडायचे, अखेरच्या क्षणी झालेली अशी अवस्था; कथित गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा – Marathi News | Rajesh Khanna invited death himself used to weep inconsolably all day alleged girlfriend makes a major revelation.


एक काळ बॉलिवूड गाजवणारे राजेश खन्ना यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. राजेश खन्ना यांच्या निधनाला 14 वर्ष पूर्ण झाली असून त्यांच्याबद्दल आजही अनेक चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. सांगायचं झालं तर, राजेश खन्ना यांनी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांनी कधी घटस्फोट घेतला नाही, पण एकमेकांपासून दूर राहिले. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये कथिक गर्लफ्रेंड अनीता आडवाणी यांनी अभिनेत्याची साथ दिली. राजेश खन्ना यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनीता त्यांच्या सोबत होत्या.

दरम्यान एका मुलाखतीत अनीता यांनी राजेश खन्ना यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल मोठा खुलासा केला. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची प्रकृती पूर्णपणे बिघडलेली. त्यांना त्यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल कळून चूकलं होतं… अनीता म्हणालेल्या, ‘एका वर्षात त्यांची प्रकृती प्रचंड खालावली. त्यांना अशा अवस्थेत पाहणं माझ्यासाठी कठीण झालेलं. ते दिवसभर ढसाढसा रडायचे… त्यांनी स्वतःच मृत्यूला आमंत्रण दिलं…’

अनीता यांनी असं देखील सांगितलं की, ‘राजेश खन्ना प्रचंड नकारात्मक झालेले. त्यामुळे आमची कायम भांडणं व्हायचीय.. मला असंच वाटत होतं की, त्यांची प्रकृती सुधारावी…’. एवढंच नाही तर, अनीता यांनी डिंपल कपाडिया यांच्याबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं. ‘अभिनेत्याच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये डिंपल त्यांच्या मुली राजेश खन्ना यांना भेटण्यासाठी यायचे आणि काही तास त्यांच्यासोबत घालवायचे… मी बाहेर असले की, ती (डिंपल) मला फोन करायची आणि विचारायची परत कधी येणार आहे, आम्ही निघू…’

‘डिंपल यांना राजेश खन्ना यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. त्यांचं सामान कुठे आहे… त्यांना भेटायला घरी कोण येतं… डिंपल यांनी काहीच माहिती नसायचं… पण शेवटच्या क्षणी त्यांचं कुटुंब त्यांच्या मुली त्यांच्यासोबत होत्या याचा मला आनंद आहे… अंजू महेंद्र देखील त्यांना भेटायला यायच्या…’ असं देखील अनीता म्हणाल्या. सांगायचं झालं तर, अंजू महेंद्र राजेश खन्ना यांच्या एक्स – गर्लफ्रेंड होत्या…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *