ठाकरेंच्या आंदोलनात बाचाबाची… पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते पोलिसांशी भिडले – Marathi News | Shiv sena ubt workers clash with police over podium stage at sonam wangchuk support protest


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आणि कार्यकर्त्यांसह शेकडो नागरीक हजर आहेत. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाची घोषणा करताना सर्व पक्षाच्या नेत्यांना हजर राहण्याचे आवाहन केले होते. अशातच आता या आंदोलनात शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवाजी पार्कवरील आंदोलनात पोलिस आणि कार्यकर्यांमध्ये बाचाबाची

मुंबईतील शिवाजी पार्कवरील शिवसेना Shivaji Park Protest : मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलन केले जात आहे. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे समोर आले आहे.
यांच्या आंदोलनात पोडियम स्टेज लावण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांत बाचाबाची झाली आहे. पोलिसांनी पोडियम स्टेज लावण्यास विरोध करताच कार्यकर्ते भडकले आणि भाजपाच्या दबावामुळे पोलीस विरोध करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांचा मोठा ताफा तैणात

शिवाजी पार्क येथील शिवसेना ठाकरे यांच्या आंदोलनासाठी मीनाताई ठाकरे पुतळा ते शिवसेना भवनापर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाचा स्टेज वाढविण्यावरून कार्यकर्ते पोलिसात झालेल्या बाचाबाची नंतर स्टेज तिथेच राहणार असल्याची माहिती देताना आता वाद मिटला असल्याची माहिती आमदार महेश सावंत यांनी दिली आहे.

तरुणाईचा आंदोलनात सहभाग

या आंदोलनात His Questions not His body अशा आशयाचे बॅनर घेवून तरुणी शिवाजी पार्क येथील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला नाही तर सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ या आंदोलनात सहभागी झाल्याचे मुलींनी सांगितले आहे. जे पेपर फुटले त्यासाठी विद्यार्थी किती तयारी करतात आणि असे पेपर फुटले तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. शिक्षण व्यवस्थेत सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराबाबत तीव्र संताप आहे. मात्र आम्ही आंदोलनात सहभागी झालो तर ट्रोल करतात, कुटुंबाला त्रास ही देतात त्यामुळे अनेक विद्यार्थी सहभागी होत नसल्याची भीती ही तरुणींनी व्यक्त केली आहे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *