रणवीरच्या धुरंधरला धोबीपछाड, या तगड्या वेब सिरीजची तुफान हवा; आली टॉप ट्रेंडिंगमध्ये! – Marathi News | Thukra ke mera pyar season 2 trending on jiohotstar kept behind dhurandhar part two


Thukra Ke Mera Pyar season 2 : प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह यांचा धुरंधर-2 हा चित्रपट चांगलाच गाजला. ओटीटी मंचावर आल्यानंतर या चित्रपटाने चांगलीच लोकप्रियता मिळवली. परंतु आता मात्र धुरंधर-2 ला एक वेबसिरीजने धुळ चारली आहे. ‘ठुकरा के मेरा प्यार’ या बेव मालिकेचा दुसरा सिझन आला असून याच सिझनने धुरंधर-2 ला मागे टाकलं आहे. त्यामुळेच आता या वेब मालिकेत नेमके आहे तरी काय? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

धुरंधर-2 ला टाकलं मागे

मिळालेल्या माहितीनुसार जिओ हॉटस्टार या ओटीटा प्लॅटफॉर्मवर ठुकरा के मेरा प्यार या वेब मालिकेचा दुसरा सिझन सध्या ट्रेंड करतोय. या वेब मालिकेने धुरंधर-2 या चित्रपटालाही मागे टाकले आहे. सिनेचाहत्यांचा ठुकरा के मेरा प्यारच्या दुसऱ्या सिझनला प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या वेब मालिकेत संचिता बसू, धवल ठाकूर, सुशील पांडे, अनुरुद्ध दवे यांनी भूमिका साकारलेल्या आहेत. ही वेब मालिका 19 जून रोजी रिलीज झाली. जिओ हॉटस्टारवर रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून लोकांनी या वेब मालिकेला पसंती दिली आहे. आता तर ही वेब सिरीज थेट पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करते आहे. प्रेक्षकांचा जबरदस्त रिस्पॉन्स लक्षात घेता आयएमडीबीनेही या वेब सिरीजला 8.2 अशी तगडी रेटिंग दिली आहे. यावरूनच ही वेब सिरीज प्रचंड लोकप्रिय होत असल्याचे बोलले जात आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये नेमकं काय आहे?

ठुकरा के मेरा प्यार ही वेब मालिका 2024 साली होती. याच बेव सिरीजचा आता दुसरा भाग आला आहे. या वेब सिरीजमध्ये प्रेम, धोका, सूडभावना तुम्हाला पाहायला मिळेल. आता दुसऱ्या सिझनमध्ये तर राजकारण आणि त्यातून घडत जाणाऱ्या घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत. पहिल्या सिझनमध्ये श्रीमंत कुटुंबातील शानविका (संचिता बसू) आणि सामान्य कुटुंबातील कुलदीप (धवल ठाकूर) हे एकमेकांच्या प्रेमात पडलेले दाखवलेले आहेत. आता दुसऱ्या सिझनमध्ये शानविका आपल्या पतीला तसेच पित्याला गमावून बसते. त्यानंतर आता ती सूड भावनने पेटली असून काय काय घडते याची उत्कंठावर्धक कथा ठुकरा के मेरा प्यार या वेब मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये सांगण्यात आलेली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *