अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूवर दुःखाचा डोंगर कोसळला, पत्नीसह दोन्ही मुलांचा मृत्यू; मॅचची तयारी करताना संसार उद्ध्वस्त | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

Argentine Footballer: व्हेनेझुएलातील भीषण दुहेरी भूकंपात अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लुकास ट्रेजो याची पत्नी आणि दोन्ही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

News18
News18

काराकास: व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर अर्जेंटिनाचा अनुभवी फुटबॉलपटू लुकास ट्रेजो याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. व्हेनेझुएलाच्या अव्वल फुटबॉल क्लब डेपोर्टिव्हो ला ग्वायराने अधिकृत निवेदनाद्वारे ट्रेजोची पत्नी आणि त्याच्या दोन्ही मुलांचा भूकंपात मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

क्लबने दिलेल्या माहितीनुसार ट्रेजोची पत्नी यानिना मारानेला तसेच त्यांची दोन मुले अॅरॉन आणि आयनोआ ट्रेजो यांचा व्हेनेझुएलातील याराकुई प्रदेशात आलेल्या दोन शक्तिशाली भूकंपांमध्ये मृत्यू झाला. भूकंपामुळे त्यांच्या राहत्या इमारतीचा मोठा भाग कोसळला होता. त्यानंतर हे तिघेही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले होते. बचाव पथकांनी अनेक तास शोधमोहीम राबवल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अधिकृत पुष्टी करण्यात आली.

या दुर्घटनेच्या वेळी लुकास ट्रेजो घटनास्थळी नव्हता. आगामी सामन्याच्या तयारीसाठी तो आपल्या क्लबसोबत काराकास येथे होता. त्यामुळे ही घटना घडली तेव्हा त्याला आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचताही आले नाही.

या दुःखद घटनेनंतर डेपोर्टिव्हो ला ग्वायरा क्लबने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत म्हटले, लुकास ट्रेजोची पत्नी यानिना मारानेला आणि त्यांची मुले अॅरॉन व आयनोआ ट्रेजो यांच्या निधनाबद्दल आम्ही अत्यंत दुःखी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि लुकास तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो.

ट्रेजोचे कुटुंब प्लाया ग्रांदे या किनारपट्टीवरील भागात राहत होते. हा परिसर दुहेरी भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांपैकी एक होता. भूकंपाच्या धक्क्यांमुळे त्यांच्या राहत्या निवासी इमारतीचा पूर्णपणे कोसळला.

पत्नी आणि मुलांचा काहीच पत्ता लागत नसल्याने लुकास ट्रेजोने कुटुंबीय, स्थानिक स्वयंसेवक आणि व्यावसायिक बचाव पथकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू केला होता. मृत्यूची पुष्टी होण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर भावनिक आवाहनही केले होते.

इन्स्टाग्रामवरील आपल्या पोस्टमध्ये ट्रेजोने लिहिले होते, प्लाया ग्रांदेमधील आमची इमारत कोसळली आहे. माझ्या कुटुंबाबद्दल मला काहीच माहिती नाही. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा आणि कोणाला ते दिसले असतील तर हा संदेश शेअर करा. मला अजूनही आशा आहे की ते त्या इमारतीत नव्हते. कृपया माझ्या कुटुंबासाठी प्रार्थना करा.

दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी शनिवारी दिलेल्या अंदाजानुसार व्हेनेझुएलामध्ये २४ जून रोजी झालेल्या या दुहेरी भूकंपाचा परिणाम सुमारे ६७.६ लाख लोकांवर झाला असण्याची शक्यता आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत जवळपास १,००० जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर संस्थेने उपलब्ध लोकसंख्या आणि नुकसानीच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यानंतर सांगितले की २४ जून रोजी व्हेनेझुएलामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे तब्बल ६७.६ लाख लोक प्रभावित झाले असावेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूवर दुःखाचा डोंगर कोसळला, पत्नीसह दोन्ही मुलांचा मृत्यू; मॅचची तयारी करताना संसार उद्ध्वस्त



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *