Ireland vs India 2nd T20I : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी क्रिकेट वर्तुळात फक्त एकाच नावाची जोरदार चर्चा होती… ती म्हणजे वंडर बॉय वैभव सूर्यवंशी. पहिल्या सामन्यापासूनच चाहते ज्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची वाट पाहत होते, त्याच वैभवला आजच्या सामन्यात खेळवलं जाईल, अशी सर्वांना खात्री होती. पण, कोणालाही काडीचाही सुगावा न लागू देता कर्णधार श्रेयस अय्यरने टीम इंडियाचे दोन छुपे मोहरे मैदानात उतरवले.
Welcoming #TeamIndia T20I Caps No. 1️⃣2️⃣0️⃣ and 1️⃣2️⃣1️⃣ 🧢👏
Things we love to see, as Suryansh Shedge and Prince Yadav are set to make their debuts 🌟
Updates ▶️ https://t.co/L8GAMNqUC4#IREvIND pic.twitter.com/XNhYh1bHB8
— BCCI (@BCCI) June 28, 2026
शेवटच्या क्षणी मैदानात ‘तिसराच’ ट्विस्ट
बेलफास्टच्या सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब मैदानावर जेव्हा नाणेफेक झाली, तेव्हा भारताचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून आधी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण खरी खळबळ उडाली ती प्लेइंग इलेव्हन जाहीर करताना. श्रेयसने दोन अनपेक्षित नावांची घोषणा केली. भारताकडून आज प्रिन्स यादव (Prince Yadav) आणि सूर्यांश शेडगे (Suryansh Shedge) हे दोन तरुण खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत असल्याचे जाहीर झाले. सामना सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वीपर्यंत या दोघांना कॅप देण्यात आली.
वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांना झटका; आता थेट इंग्लंडमध्ये धमाका?
या निर्णयामुळे वैभव सूर्यवंशीच्या चाहत्यांमध्ये काहीशी नाराजी पसरली आहे. आयर्लंडविरुद्धच्या या मालिकेत वैभवला मैदानात पाहण्याचे स्वप्न तूर्तास अपूर्ण राहिले आहे. पण सूत्रांच्या मते, हा भारतीय संघ व्यवस्थापनाच्या एका मोठ्या रणनीतीचा भाग आहे. वैभवला आयर्लंडविरुद्ध विश्रांती देऊन, थेट आगामी इंग्लंड दौऱ्यात थेट मोठ्या मंचावर लाँच करण्याचा मास्टरप्लॅन टीम इंडिया आखत असल्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे.
भारतासमोर मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान
पहिल्या सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघ सध्या मालिकेत 0-1 ने मागे आहे. जर दुसरा सामना भारताने जिंकला, तरच ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटू शकते. अन्यथा, आयरलँडसारख्या संघाविरुद्ध मालिका गमावण्याची नामुष्की भारतावर ओढवू शकते. यात भर म्हणून की काय, या दुसऱ्या सामन्यावर पावसाचे मोठे सावट आहे. जर पावसामुळे सामना धुवून निघाला, तर भारताला मालिकेवर पाणी सोडावे लागेल आणि आयरलँड ऐतिहासिक मालिका विजय साजरा करेल.
आयर्लंड संघाची प्लेइंग-11 : टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लियाम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रे, जय मुंद्रा, मॅथ्यू हॉलर्ड.
भारत संघाची प्लेइंग-11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
हे ही वाचा –
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला