Eetha Shraddha Kapoor: ‘छावा’ सिनेमातील अभिनेता ‘ईठा’मध्येही झळकला, श्रद्धा कपूरसोबत मराठीत बोलला, भन्नाट किस्साही सांगितला


Shubhankar Ekbote on Shraddha Kapoor: ‘ईठा’ (Eetha) या सिनेमाच्या टीझर (Eetha teaser) आणि फर्स्ट लूकनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या सिनेमात श्रद्धा कपूरनं (Shraddha Kapoor) तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर(Vithabai Narayangaokar) यांची भूमिका साकारली असून, तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. तिची अदा, तिचे नृत्य आणि विठाबाईंची जीवनगाथा हे पाहण्यासाठी  प्रेक्षक हा सिनेमा पाहण्यासाठी  आतुर आहेत. ‘ईठा’ या  सिनेमात श्रद्धा कपूरऐवजी इतर कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत. या कलाकारांच्या यादीत अभिनेता शुभंकर एकबोटे याच्याही नावाचा समावेश आहे.  अनेक सिनेमा आणि टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा शुभंकर आता  ‘ईठा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या सिनेमाचे शूटिंग नेमके झाले कसे? श्रद्धा कपूरसोबत काम करतानाचा अनुभव कसा होता? या चित्रपटाच्या संबंधित अनेक किस्से त्याने शेअर केले आहेत. 

शुभंकर एकबोटेनं श्रद्धा कपूरसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला (Shubhankar Ekbote on Shraddha Kapoor)

अलिकडेच शुभंकर एकबोटे यानं  महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं ‘ईठा’ सिनेमात काम करतानाचा अनुभव शेअर केला. तसेच श्रद्धा कपूरने त्याचे कौतुक करत नेमकं काय म्हटलं? याची माहिती त्यानं मुलाखतीत दिली.  मिळालेल्या माहितीनुसार, शुभंकर एकबोटे याचे या सिनेमातील भूमिकेत थोडा उर्मटपणा आहे. श्रद्धा कपूरसोबत काम करतानाचा अनुभव शेअर करताना अभिनेता म्हणाला, ‘श्रद्धा कपूर या उत्तम मराठी बोलतात.   त्यांना नक्कीच या सिनेमात काम करत असताना याचा फायदा झाला असणार.  त्या अगदी आपल्यासारखं मराठी बोलतात’, असं शुभंकर म्हणाला.

‘आमच्यात जे काही सेटवर बोलणं झालं ते मराठीतच झालं होतं.  या सिनेमात माझा एक सीन होता. सीन शूट करत असताना मला तिनं एक कॉम्पलिमेंट सुद्धा दिली होती. ती कॉम्पलिमेंट माझ्यासाठी खूप मोठी बाब आहे. सीननंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता. तुम्ही नाटकवाले ना? तुम्ही नाटकात काम  केलंय ना? खरंतर तुमचा अभिनय सुरू झाला आणि मला लगेच तुमच्यावर राग आला. म्हणजे तुमचं पात्र मला इतकं खरं वाटलं की तो राग माझ्या मनात आपोआप आला.  श्रद्धा कपूरसारख्या अनुभवी अभिनेत्रीकडून ही कॉम्पलिमेंट मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती’, असंही शुभंकर म्हणाला. 

‘श्रद्धा कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत   बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलंय.  त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत मोठ्या दिग्दर्शकांसह काम केलं आहे. एकीकडे त्यांनी  हसिना पारकरसारखी भूमिका साकारली आहे. आता ते विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारत आहेत.  खूप छान वाटलं. या सिनेमात मराठी कलाकारांचीही फौज आहे.  मराठी कलाकारांसोबत काम करत असताना खूप छान वाटलं, वेळ घालवायलाही मिळालं.  सिद्धार्थ जाधव यांचीही या सिनेमात भूमिका आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवता आलं, त्यांच्याकडून शिकता आलं’, असं शुभंकर म्हणाला. शुभंकर याने सिनेमा तसेच मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यानं आपल्या कारकि‍र्दीत लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत ‘छावा’सिनेमातही काम केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान! माजी मुख्यमंत्र्यांची बनली दुसरी बायको; लग्नाचे Photos व्हायरल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *