पतीचं निधन, लेकीचं लग्न! घरात एकटी असलेल्या 55 वर्षीय महिलसोबत नराधमाने….; मुंबईतील घटनेने सर्वच हादरले | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

Mumbai Shocking News : मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलगी दुसऱ्या शहरात राहण्यासाठी गेली आणि आई दुसरीकडे एकटीच राहत होती. पण काही दिवसांनंतर मुलीला एक कॉल येतो. मात्र या कॉलनंतर काय घडते आणि पोलिस स्टेशनची पायरी का चढावी लागते, त्याबाबत सविस्तर जाणून घ्या.

News18
News18

मुंबई : शनिवारी सकाळपासून तिचा फोन वारंवार वाजत होता, पण पलीकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता. आईच्या काळजीपोटी मुलीने धावत जाऊन घराचे कुलूप जेव्हा तोडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. अवघ्या काही तासांत मुंबईतील मलबार हिलमध्ये नेमकं काय घडलं होतं?

नेमके प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मलबार हिलमध्ये ही खळबळजनक घटना घडल्याची समोर आलेली आहे. 55 वर्षीय ज्योती पवार या सिमलानगर येथे एकट्याच राहत होत्या. काही काळापूर्वी त्याच्या पतीचे निधन झाले असून त्यांची विवाहित मुलगी एकता जाधव ही दहिसर भागात वास्तव्यास आहे. खरं तर ज्योती या मलबार हिल परिसरातीलच एका घरात घरकाम करुन आपला उदरनिर्वाह करत होत्या. मात्र शुक्रवारी साधारण साडेआठ ते शनिवार दुपारी दोन वाजेच्या घडलेल्या घटनेने सर्वच बदलले.

दरदिवशी कामावर जाणाऱ्या ज्योती पवार या नेहमीप्रमाणे शनिवारी कामावर गेल्या नाहीत. अनेक तास उलटले तरी त्या न आल्याने त्यांच्या मालकिणीने त्यांच्या मोबाईलवर कॉल करुन त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र वारंवार फोन करुनही ज्योती यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेत मालकिणी या चिंतेत आल्या आणि त्यांनी याबाबतची माहिती दहिसर येथे राहत असलेल्या त्यांच्या मुलीला दिली.

कुलूप तोडताच समोर आले…

आपली आई फोन उचलत नसल्याचे समजताच मुलगी एकताने तातडीने मलबार हिल येथील आईच्या घरी गेली. पण घराला बाहेर कुलूप असल्याचे पाहून तिला वेगळाच संशय येऊ लागला. त्यानंतर एकताने शेजाऱ्यांच्या मदतीने आईच्या घराचे कुलूप तोडले आणि घरात गेली. धक्कादायक म्हणजे घरात जाताच तिला तिची आई रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत दिसली.

घरातील परिस्थिती पाहून घरात चोरी झाल्याचे स्पष्टपणे दिसत होती. त्यांनी याबाबतची माहिती तातडीने पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि तपास वेगाने करण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर पोलिसांनी अखेर सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी मोहम्मद कैफ याला काही तासांतच अटक केली आहे.

‘या’ अडचणीमुळे उचलले टोकाचे पाऊल

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने आपण गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. पण आरोपी हा मोठ्या आर्थिक नुकसानीत होता. हेच नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने चोरीच्या उद्देशाने घरात गेला आणि जेव्हा ज्योती यांनी विरोध केला असता त्यांची हत्या केली आणि घरातील मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला.

मराठी बातम्या/मुंबई/

पतीचं निधन, लेकीचं लग्न! घरात एकटी असलेल्या 55 वर्षीय महिलसोबत नराधमाने….; मुंबईतील घटनेने सर्वच हादरले



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *