मोठी खळबळ! खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले जे जातील… – Marathi News | Uddhav thackeray first comment on ubt party mp revolt and formation of new group


UBT Party MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच पक्षफुटीबाबत दिल्लीमध्ये मोठ्या हलाचाली वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या या पहिल्या प्रतिक्रियेचे अनेक
अर्थ काढले जात आहे.

आजचा दिवस माझा नाही, पण…

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी खासदरांच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, त्यांच भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही. पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जो सोडून जाईल, त्यांना एक दिवस नक्की पश्चात्ताप होईल, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी सहन करायला शिकावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळेदेखील ठाकरे यांच्या पक्षातील फुटीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

बैठकीला खासदार गैरहजर

पक्षात होणारी संभाव्य फूट लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी आपल्या सर्व खासदारांची एक बैठक बोलवली होती. या बैठकीला एकूण 9 खासदारांपैकी 5 खासदार उनुपस्थित होते. परंतु ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उर्वरित 5 खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावली, असा दावा केला होता. तसेच कोणताही खासदार आमच्या पक्षातून जाणार नाही, असा दावाही केला होता.

दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय?

सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत. दिल्लीत ते आपल्या वेगळा गटाबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे यांच्या पक्षाचे  खासदार संजय देशमुख यांनी शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *