Last Updated:
Kalyan Shocking Incident : मुसळधार पाऊस सुरु असताना एक महिला चिमुकल्यांच्या आनंदासाठी बाहेर पडली. मात्र वाटतेच असं काही होईल आणि दोन लहान चिमुकल्यांपासून त्यांची आई कायमची हरावली जाईल, अशी कल्पना कधीच कोणी केली नव्हती.
कल्याण : पावसाळ्याचे दिवस म्हणजे प्रत्येकासाठी आनंदीची एक पर्वणीच असतो. विशेष करुन लहान मुलांसाठी आवडतीची ऋतू असतो. धो धो पाऊस पडत असताना लहान मुलं बऱ्याचदा खाऊ मागतात आणि पाऊसाचा आनंद घेतात. मात्र असाच एक पावसाळा कल्याण परिसरात राहणाऱ्या चक्र कुटुंबाला कधीच न भरुन निघणारे दु:ख घेऊन गेला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कल्याण आणि डोंबिवली परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्देवी घटनेतील महिलेचे नाव 42 वर्षीय शशी चक्र असे असून त्या कल्याणमधील हनुमानगर या परिसरात आपल्या पती आणि दोन लहान मुलांसह राहतात. गुरुवारी सु्द्धा शहरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत होता. या दरम्यान शशी या आपल्या लहान मुलांसाठी खाऊ आणण्यासाठी याच पावसातून घराच्या बाहेर पडल्या.मात्र त्यांना जराही कल्पना नव्हती की काळ बाहेर दबा धरुन बसला आहे.
घरातून बाहेर पडताना त्यांच्या घराच्या परिसरात महावितरणच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर एक इलेक्ट्रिक वायर उघड्यावर पडलेली होती. सतत शहरात पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरील साचलेल्या त्या पाण्यात हा विद्युतप्रवाह पसरला होता. दरम्यान शशी खाऊ घेयला जात असताना नेमका त्यांच्या पाय या पाण्यात पडला आणि त्यांना विजेचा जोरदार झटका बसला.
हा प्रकार त्या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या लक्षात येता त्यांनी शशी यांना त्या पाण्याच्या बाहेर काढले. मात्र शशी यांना विजेचा करंट इतका जोरदार होता की, रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला होता.
हनुमानगर या परिसरात घडलेल्या या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप पसरला आहे.एवढेच नाही तर पावसाळा पूर्व कामाच्या नावाखाली फक्त देवाखा केला जात आहे आणि प्रत्यक्ष पाहिले तर उघड्या तारांकडे दुर्लक्ष केले जाते, असाही आरोप नागरिकांनी केला आहे. शिवाय सध्या टिळकनगर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
Mumbai,Maharashtra
मुसळधार पाऊसात चिमुकल्यांना खाऊ आणण्यासाठी गेली अन्… परतलीच नाही; महिलेसोबत वाटेतच दुर्दैवी घडले
