भारताचे १ लाख येथे चक्क १ कोटी बनतात, कमी बजेटमध्ये करा परदेश दौरा, भारताशी आहे नाते… – Marathi News | Here, 100,000 Indian Rupees miraculously turn into 10 million—plan a budget friendly trip to Uzbekistan!


जर तुम्ही परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहात असाल परंतू बजेट पाहून जर विचार बदलत असाल तर आता काही अडचण राहणार नाही. भारताचे लोक कमी पैशात आतापर्यंत नेपाळ आणि भूतानची सफर करु शकत होते. परंतू एक देश असाही आहे की जेथे भारतीय लोक १ लाख रुपये घेऊन जातील तर तेथील करन्सीत ते एक कोटी रुपये होतील. तसे तर जगात अनेक देश आहे, जेथे भारतीय रुपयांची किंमत अधिक आहे. परंतू आपण अशा एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत. जेथे भारताचे एक लाख एक कोटीच्या समान आहेत.

आपण ज्या देशासंदर्भात बोलत आहोत तो देश खूपच सुंदर देखील आहे. आणि कमी पैशात तुम्ही एक लक्झरी ट्रीप येथे करू शकता. हा सुंदर देश मध्य आशियातील आहे. ज्याचे नाव आहे उझबेकीस्तान आहे. येथे भारताचे एक रुपये जवळपास १२५ उझबेकिस्तानी सोम (UZS) चलनाच्या बरोबर होतात. याच मुळे कमी बजेटमध्येही तुम्ही येथे आलिशान फॉरेन ट्रीपचा आनंद घेऊ शकता.

भारताशी नाते…

मध्य आशियातील मुस्लीम देश असलेला उझबेकिस्तान हा त्याच्या समृद्ध ऐतिकासिक वारसा, सुंदर आर्किटेक्चर आणि संस्कृतीसाठी जगात प्रसिद्ध आहे. या शहरातील समरकंद, बुखारा आणि ताश्कंद टुरिस्टमध्ये आकर्षणाचे केंद्र आहेत.पुरातन रेशीम मार्गाचा भाग असलेली ही शहरे तेथील प्राचीन मशिदी, आणि रंगबिरंगी बाजारांसाठी ओळखले जातात.भारतावर मुघल सम्राज्य स्थापन करणारा मुघल सम्राट बाबर येथील समरकंद येथील निवासी होता.

ही एक डबल लँड लॉक्ड कंट्री आहे. याचा अर्थ या देशाची कोणतीही सीमा स्वत: समुद्राला मिळत नाही. तसेच त्याच्या शेजारी देशांची सीमाही समुद्राला लागून नाही. अफगाणिस्तान आणि तुर्कमेनीस्तानशी उझबेकिस्तानची सीमा लागते. येथे जाण्यासाठी भारतीयांना व्हीसाची गरज लागत नाही. जर दिल्लीवरुन ताश्कंद फ्लाईटने एका दिशेचे भाडे 20 हजार रुपयाने सुरु होते.

1 लाख तेथील 1 कोटी

जर तुम्ही भारतातून १ लाख रुपये घेऊन उझबेकिस्तानला गेला तर तेथील करन्सीत हे सुमारे १.२५ कोटी सोमच्या आसपास होतील. त्यामुळे येथे तुम्ही स्वत:ला करोडपती समजू शकता.या पैशातून तुम्ही येथे फिरुन आनंद लुटू शकता.तसेच शॉपिंग देखील स्वस्तात करु शकता.

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी बेस्ट ठिकाण

उझबेकिस्तान त्या लोकांसाठी बेस्ट ठिकाण आहे ज्यांना कमी खर्चात लक्झरी ट्रीपची मजा घ्यायची आहे. येथे हॉटेल, लोकल ट्रान्सपोर्ट, जेवण आणि फिरणे याचा खर्च युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी आहे. येथे तुम्ही ८ ते १० हजारात कम्फर्टेबल हॉटेल आणि चांगल्या जेवणाचा आनंद घेऊ शकता.

उझबेकिस्तानची खासियत केवळ स्वस्ताई नाही तर येथील संस्कृती रंजक आहे. येथील लोक पाहुण्यांच्या आदरातिथ्य चांगले करतात. पर्यटकांना खूप चांगले स्वागत करतात. तेथील पारंपारिक जेवण प्लोव, समसा आणि कबाब यांची चव जबरदस्त आहे. याची मजा घेण्यासाठी दूरवरुन लोक येथे येतात.

भारतातून उझबेकिस्तानची फ्लाईट कनेक्टिव्हिटी देखील चांगली होत आहे. त्यामुळे येथे पोहचणे सोपे झाले आहे. व्हीसा प्रोसेस देखील अनेक प्रवाशांसाठी पहिल्या पेक्षा सोपी केली आहे. जर पुढच्या वेळी तुम्ही परदेशात जाण्याचा प्लान करत असाल तर या सुंदर देशाला भेटण्यासाठी नक्की जा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *