Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच


नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन पुन्हा वाढला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनीसंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. ट्रम्प यांचा दावा इराणला थेट आव्हान मानलं जातंय. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली आहे. ती इराणसोबत असताना खुली असेल किंवा इराण सोबत नसलं तरी खुली असेल, असं ट्रम्प म्हणाले. इराणची नाकेबंदी पुन्हा लागू केलीय, असं ट्रम्प म्हणाले.  

इराण सोडून इतर देशांसाठी मार्ग खुला

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की इराणची नाकेबंदी केल्याचं म्हटलंय, इराणची जहाजं आणि त्यांच्या ग्राहकांची जहाजं रोखली जायची. होर्मुझची सामुद्रधुनी निष्पक्षपणे खुली असून त्याचा वापर सुरु आहे, असं ट्रम्प म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संरक्षक म्हणून अमेरिका काम करणार असल्याचं म्हटलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीला निष्पक्षपणानं सुरक्षित ठेवण्यासाठीच्या खर्चासाठी प्रत्येक जहाजावर 20 टक्के दरानं टोल आकारला जाईल, असं ट्रम्प म्हणाले. ही प्रक्रिया लगेचच आणि तातडीनं सुरु होईल, असं ट्रम्प म्हणाले. 

ट्रम्प यांच्या दाव्यानं इराणचा संताप

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यामुळं इराणनं संताप व्यक्त केला आहे. इराणकडून अमेरिकेला इशारा दिला आहे. होर्मुझचं व्यवस्थापन करण्यामध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप मान्य करणार नाही, असं इराणकडून सांगण्यात आलं आहे. इराणनं स्पष्ट केलं की होर्मुझमध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही. जर अमेरिकेनं हस्तक्षेप केला तर कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल. अमेरिकेला या प्रश्नात इतर देशांनी साथ दिल्यास ते देखील युद्धात सहभागी आहेत, असं मानलं जाईल, असं इराणनं म्हटलं. 

इराणचे अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले

इराणकडून आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत. पॅट्रियट एअर डिफेन्सला पूर्णपणे नष्ट करण्यात आलंय. इराणनं कुवेतमधील दोन एअरबेसवरील पॅट्रियट एअर डिफेन्स सिस्टीम, फ्यूएल टँक आणि अमेरिकनं लष्करी तळावर हल्ले करत ते पूर्णपणे नष्ट केलेत. इराणच्या सरकारी मीडियानुसार  Eye for An Eye म्हणजेच जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *