Actor Arrested Ahmedabad: खूनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर पॅरोलवर बाहेर आलेला आरोपी तब्बल 12 वर्षे फरार राहून अभिनेता म्हणून काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबाद क्राइम ब्रांचने हेमंत मोदी या आरोपीला अखेर अटक केली. विशेष म्हणजे, तो मुंबईत ‘स्वप्निल मोदी’ या नावाने चित्रपट, वेब सीरिज आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करत होता. आता अहमदाबादमध्ये एका सिरीयलचे शूटिंग करताना सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
नेमकी प्रकरण काय ?
पोलिसांच्या माहितीनुसार, हेमंत मोदी हा मूळचा वकील आहे. 2005 मध्ये अहमदाबादच्या नरोदा भागात झालेल्या एका वादानंतर नरेंद्र तांबले उर्फ नन्नो यांच्या खूनप्रकरणात त्याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात 2008 मध्ये न्यायालयाने सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
शिक्षेनंतर हेमंतला साबरमती जेलमधून मेहसाणा जेलमध्ये हलवण्यात आले होते. 2014 मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने त्याला 30 दिवसांची पॅरोल मंजूर केली होती. मात्र, पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो फरार झाला. पोलिसांनी सांगितले की, फरार झाल्यानंतर हेमंत मुंबईला गेला. तेथे त्याने नाव बदलून ‘स्वप्निल मोदी’ असे ठेवले. त्याने आपली हेअरस्टाईल आणि राहणीमानही बदलले. त्यानंतर चित्रपट, टीव्ही मालिका आणि वेब सीरिजमध्ये साईड रोल करत अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.
क्राइम ब्रांचने केली कारवाई
अहमदाबाद क्राइम ब्रांचचे निरीक्षक पीएम धाकडा यांनी सांगितले की, आरोपी सध्या ‘मोटी बानी नानी बहू’ या मालिकेच्या शूटिंगसाठी अहमदाबादमध्ये आला होता. त्याच्याबाबत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली. अभिनेत्याला अटक करण्यासाठी गेलो असता त्याचा अभिनय एवढा शानदार होता की त्याला ओळखणे कठीण होते. शूटिंग संपवून घरी परतत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला आरोपीने स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जुन्या अटकेवेळी नोंदवलेल्या शरीरावरील खुणांची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. अखेर त्याने आपणच हेमंत मोदी असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, अहमदाबादच्या कोट परिसरात राहत असताना त्याने घरमालकाला कोणतीही ओळखपत्रे दिली नव्हती. त्यामुळे स्थानिकांना संशय आला होता. एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर क्राइम ब्रांचने कारवाई केली. दरम्यान, अभिनय क्षेत्रात ओळख निर्माण करण्यासाठी आणि पकड टाळण्यासाठी त्याने नाव बदलल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
शेजारच्या मित्राचा काटा काढला
बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमंत मोदी अहमदाबादच्या नरोडा येथील सैजपूर बोघा येथील चाळीत राहत होता. शेजाऱ्यांशी भांडण झाल्यानंतर 12 जून 2005 रोजी त्याने भाऊ आणि मित्रांसह शेजारच्या मित्राचा नरेंद्र तांबळेचा काटा काढला. तो स्वतः वकील असल्याने त्याने त्याच्यासोबत अटक झालेल्या सात जणांचा खटला लढला.पण 2008 मध्ये कोर्टाने हेमंत मोदीसह सातही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलीनंतर आपण नैराश्यात असल्याची तक्रार केल्यामुळे अहमदाबादच्या साबरमती तुरुंगातून त्याला मेहसाणा कारागृहात हलवण्यात आले.कोर्टाच्या निर्णयानंतर 6 वर्षांनी गुजरात उच्च न्यायालयाकडून हेमंतला 30 दिवसांचा पॅरोल मिळाला.कारण नंतर तो फरार झाला. काही काळ वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यानंतर अभिनय क्षेत्रातील संधीच्या शोधात तो मुंबईत आला. तिथे त्याला एका नावाजलेल्या अभिनेत्या सोबत साईड रोल मिळाला. त्यानंतर अनेक नाटकांमध्ये त्याला कामे मिळू लागली. मग त्याने त्याचे नाव स्वप्निल मोदी असे केले. त्याने त्याची हेअर स्टाईल बदलली . त्याने चित्रपट टीव्ही मालिका आणि वेब सिरीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. दक्षिणात्य आणि गुजराती चित्रपटांमध्येही त्याने काम केले पण त्याला कोणीही ओळखले नाही. नंतर तो गुजराती चित्रपटांबरोबर मालिकांमध्ये साईड रोल करायला लागला.
आणखी वाचा