नाशिक आयटी प्रकरणाचा संबंध थेट मलेशियाशी, धर्मांतराच इंटरनॅशनल रॅकेट; शिवसेना नेत्याच्या दाव्याने खळबळ – Marathi News | Nashik it conversion case linked to malaysia pakistan sanjay nirupam big claim


नाशिकमधील एका आयटी कंपनीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी कसून तपास सुरू असून आता या प्रकरणाचा मलेशियासी संबंध असल्याचे समोर आले आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी याबाबत गंभीर आरोप केला आहे. नाशिक आयटी प्रकरणाचा संबंध मलेशिया आणि पाकिस्तानशी असून हे धर्मांतरचे इंटरनॅशनल रॅकेट असल्याचे निरूपम यांनी म्हटले आहे. तसेच MIM पक्षा यात सामील असून त्यांचा यात मोठा रोल आहे. या प्रकारात मोठे फंडिंग झाले आहे, आरोपींना पैसे मिळत होते, ते पैसे कोण देत होते? कुठून येत होते त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी निरूपम यांनी केली आहे.

कमी वयाच्या मुलींना टार्गेट करायचे…

संजय निरूपम यांनी म्हटले की, 25 मार्च रोजी TCS मध्ये हिंदू मुली ज्यांचे लैंगिक छळ, धर्मांतरासाठी दबाव आणला होता, त्यात अजून SIT कडून 9 एफआयआर झाले आहेत. नवीन चार्जशीट भयंकर आहेत. डॅनिश शेख, तौफिक आणि निदा खान संघटित मानसिक हेरा फेरी करत होते. कमी वयाच्या मुलींना टार्गेट करायचे. व्हिडिओ पाहायला लावायचे, इस्लामिक गोष्टी पाहायला दबाव आणायचे. निदा खानने हे सर्व स्वीकारलं आहे. चौकशी दरम्यान ती स्वत: नमाज साठी शिकवण द्यायची असं निदा खानने म्हटलं आहे. हे सर्व मोठ कट कारस्थान आहे. यांच्या मागे कोण आहे, याची चौकशी सुरू आहे.

निदा खान पाकिस्तानच्या संपर्कात होती…

पुढे बोलताना निरुपम म्हणाले की, ‘एकाला मलेशिया पाठवायचे नियोजन होते आणि त्याची सर्व जबदारी इमरान कडे होती. हा इमरान कोण आहे याचा शोध घेणे सुरू आहे. निदा खान पाकिस्तानातील कोणाच्या तरी संपर्कात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर काय प्रकार सुरू आहे याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे. सगळ्या कॉर्पोरेट ठिकाणी असंच चालू आहे का याची चौकशी झाली पाहिजे. 40 दिवस फरार असलेली निदान खान मतीन पटेल कडे सापडली. तिला एमआयएमच्या नगरसेवक कडून संरक्षण देण्यात आलं.’

महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा तयार व्हायला हवा

संजय निरूपम यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘चौकशी करत असताना मतीन सारखा बोलायचा की इम्तियाज भाई से पूछ के बताऊंगा. इम्तियाज कोण ही चौकशी केली तर तो म्हटला इम्तियाज जलील. TCS देखील यामध्ये दोषी आहे. पॉश अॅक्टनुसार प्रत्येक ऑफिसमध्ये महिलांसाठी एक चांगले वातावरण असायला व्हावे त्याच्यासाठी ऍक्टिव्हिटी देखील असते, कमिटी देखील असते. पण त्यांनी तसं काहीही केलं नाही, तेही दोषी आहेत त्यांना ही शिक्षा व्हायला हवी. आपल्या सगळ्या मुलींनी सुरक्षित आणि चांगला वातावरणात काम केलं पाहिजे. त्यासाठी एकच चांगला नियम तयार झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *