नवीन फोन घ्यायचाय? 50 MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी असणारे 2 भन्नाट फोन, एकदा फिचर्स पाहा – Marathi News | These 2 new smartphones priced under Rs 10 thousand have 50 megapixel cameras and large batteries


तुम्ही जर 10 हजार रुपयांच्या बजेटमध्ये 50-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर आणि 5000mAh बॅटरी असलेला फोन शोधत असाल, तर आजची बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय बाजारात या बजेटमध्ये असे दोन फोन आहेत जे ही दोन्ही वैशिष्ट्ये देतात. एक सॅमसंगचा स्मार्टफोन आणि दुसरा Ai+ चा. या स्मार्टफोन्सची किंमत काय आहे, ते कोणत्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये कोणते फिचर्स आहेत? ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी F07 ची किंमत आणि फिचर्स

50-मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असलेला हा बजेट फोन फ्लिपकार्टवर 9 हजार 999 रूपये किमतीला विकला जात आहे. या किमतीत तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज मिळेल. तर सॅमसंगच्या या फोनमध्ये उत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. ज्यात 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ G99 प्रोसेसर, 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी यांचा समावेश आहे. तसेच, हा फोन धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP54 रेटेड आहे.

या हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फ्लिपकार्ट ॲक्सिस किंवा फ्लिपकार्ट एसबीआय बँक कार्ड वापरून हा फोन खरेदी केल्यास अतिरिक्त 500 रूपयांची सूट देखील मिळेल.

एआय प्लस पल्स 2 ची किंमत आणि फिचर्स

50-मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्यासह येणाऱ्या या हँडसेटमध्ये 6.7-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. हा फोन तुम्हाला फ्लिपकार्टवर 8 हजार 999 रूपयांच्या किमतीतमध्ये मिळेल, ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटचा समावेश आहे. या फोनमध्ये 5000mAh क्षमतेपेक्षा मोठी म्हणजे 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे. सेल्फीसाठी, 120Hz रिफ्रेश रेट असलेला 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि अँड्रॉइड 16 ऑपरेटिंग सिस्टीम आहे.

हे लक्षात ठेवा: किमती बदलू शकतात आणि ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. कोणताही फोन निवडण्यापूर्वी कृपया लोकांनी त्या फोनबद्दल दिलेले रिव्ह्यु वाचा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *