Dharashiv Food poisoning News : धाराशिवच्या कळंबमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शीतपेय पिल्याने 2 नर्सेसला विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. पूजा जाधव आणि पल्लवी सौदागर या दोन नर्सेस ला विषबाधा झाली आहे. पूजा जाधव यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर लातूर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलला अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर पल्लवी सौदागर यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरु आहेत.
शीतपेय वाटण्या अगोदरच नर्सेसला विषबाधा
धाराशिवमध्ये शेगावच्या गजानन महाराजांच्या वारीत शीतपेय वाटले जाणार होते, अशी माहिती मिळत आहे. शीतपेय वाटण्या अगोदरच नर्सेसला विषबाधा झाली आहे. विषबाधा झाल्याची घटना घडल्यानंतर एफडीएचे पथक घटनास्थळी झाले आहे. एफडीएने वारीत वाटले जाणारे हे शीतपेय जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासन पोलीस व सरकारी दवाखान्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. शीतपेय कुठून आले कोण वाटणार होते? याचा तपास सुरु आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. शहादा शहरातील समाज कल्याण वस्तीगृहात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. डाळ भात, शेवगा, चपाती खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वस्तीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
अन्न विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु
अन्न विषबाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तहसीलदार संभाजी पाटील, प्रांत अधिकारी दीपक गिरासे, शहादा पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. निष्कृष्ट अन्न देत असल्यामुळं आम्ही या अगोदरही तक्रार केल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. वसतीगृहातील वॉर्डन आणि शिक्षक रुग्णालयात न आल्याने विद्यार्थ्यांचा आक्रोश आहे.
ठाण्यातही 55 ते 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीदरम्यान अन्नातून विषबाधा
ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील वर्तकनगर येथील एका खाजगी शाळेतील सुमारे 160 मुलं सहलीला गेले असताना 55 ते 60 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीदरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्ती आणि शाळा प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा दादू पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि शाळा प्रशासन तसेच महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा