तुला संपवून टाकू… दीपाली सय्यद यांना महिला नेत्याकडूनच धमकी, राजकारणात खळबळ – Marathi News | Deepali Sayyad Receives Threat From Woman Politician Over Bhondu Kharat Film Political Stir Erupts


प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. त्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातवर येणाऱ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. मात्र या दरम्यान त्यांना धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, एका महिला नेत्याकडूनच दीपाली सय्यद यांना धमकी मिळाल्याची माहिती समोर येत असून, यामुळे राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

चित्रपटात काम न करण्यासाठी दबाव

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ‘भोंदू खरात’ या विषयावर एक नवा चित्रपट तयार करण्यात येत आहे. या चित्रपटात दीपाली सय्यद काम करत आहेत. मात्र, याच चित्रपटात काम न करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. एका महिला नेत्याने त्यांना या संदर्भात थेट फोनवरून किंवा मेसेजद्वारे धमक्या दिल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची धमकी

या धमकीचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. जर दिपाली सय्यद यांनी या ‘भोंदू खरात’वर आधारित चित्रपटात काम करणे थांबवले नाही आणि या प्रकल्पातून बाहेर पडल्या नाहीत, तर त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द संपवून टाकू, असा थेट इशारा संबंधित महिला नेत्याने दिला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीला आणि सत्ताधारी पक्षाशी संबंधित राजकीय नेत्याला अशा प्रकारे धमकी मिळाल्याने आता हा विषय चिघळण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर दीपाली सय्यद नेमकी काय अधिकृत भूमिका घेतात आणि पोलीस प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

चित्रपटाविषयी काय म्हणाल्या होत्या?

भोंदूबाबा अशोक खरातची मला कल्पनाच नव्हती. बाहेर आल्यानंतर (बिग बॉसच्या घरातून) कळलं की असा एक भोंदूबाबा आला आणि त्याने पूर्ण हलवून टाकलं सगळीकडे. पण चित्रपट मी काढत नाहीये हा चित्रपट दुसरं कोणी काढतंय. प्रोड्युसर मी नाहीये. पण मी कलाकार म्हणून त्या चित्रपटात दिसणार आहे. लवकरच मी तुमच्यासमोर येणार आहे. रुपाली ताईंबरोबर जे काही झालं असेल ते इतके वर्षापासून आहे असे दीपाली सय्यद म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *