SRH vs RR, Eliminator : वैभव सूर्यवंशीचा महारेकॉर्ड, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज – Marathi News | Ipl 2026 rr vs srh eliminator rajasthan royals batter vaibhav sooryavanshi became most youngest batter to smashed fastest fifty ipl knockouts and equal suresh raina record see stats


राजस्थान रॉयल्सचा युवा आणि विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर (IPL 2026 Eliminator) सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध इतिहास घडवला आहे. वैभवने (Vaibhav Sooryavanshi) महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध यशस्वी जैस्वाल याच्या सोबतीने राजस्थान रॉयल्सला विस्फोटक सुरुवात करुन दिली. वैभवने या दरम्यान अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने या एका अर्धशतकी खेळीसह खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. वैभवने नक्की काय काय केलं? हे जाणून घेऊयात.

सनरायझर्स हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स याने टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगसाठी भाग पाडलं. राजस्थानच्या यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या सलामी जोडीने या संधीचा फायदा घेतला. वैभवने एका बाजूने सुरुवातीपासूनच आक्रमक सुरुवात करुन हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली. वैभवने या दरम्यान पॅट कमिन्स याच्या एका ओव्हरमध्ये सलग आणि एकूण 3 सिक्स ठोकून 25 धावांची कमाई केली.

वैभवचं वादळी अर्धशतक

वैभवने तडाखा सुरुच ठेवत हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई केली. साकीब हुसैन याने टाकलेल्या चौथ्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर वैभवने षटकार खेचला. वैभवचा हा 19 व्या मोसमातील 60 वा सिक्स ठरला. वैभवने यासह ख्रिस गेल याचा एका मोसमात सर्वाधिक 59 षटकारांचा विक्रम मोडीत काढला.

त्यानंतर वैभवने पुढच्याच बॉलवर आणखी एक सिक्स ठोकला. वैभवने यासह अर्धशतक पूर्ण केलं. वैभव यासह प्लेऑफमध्ये वेगवान अर्धशतक करणारा फलंदाज ठरला. तसेच वैभवने प्लेऑफमध्ये सुरेश रैना याच्या सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाची बरोबरी केली.

वैभवकडून पॅट कमिन्सची धु धु धुलाई

प्लेऑफमध्ये वेगवान अर्धशतक करणारे फलंदाज

सुरेश रैना : 16 चेंडू, विरुद्ध पंजाब, 2014

वैभव सूर्यवंशी : 16 चेंडू, विरुद्ध हैदराबाद, 2026

एडम ग्रिलख्रिस्ट, 17 चेंडू, विरुद्ध डीसी, 2009

महेंद्रसिंह धोनी, 20 चेंडू, विरुद्ध बंगळुरु, 2012

ड्वेन स्मिथ, 21 बॉल, विरुद्ध चेन्नई, 2013

लाईव्ह स्कोअरकार्ड


वैभवने अवघ्या 16 चेंडूत 337.50 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. वैभव यासह 54 धावांवर पोहचला. वैभवने या 54 पैकी 52 धावा या फक्त 9 चेंडूत केल्या. वैभवने या खेळीत 8 षटकारांसह 1 चौकारही ठोकला. वैभवने यासह प्लेऑफमध्ये वेगवान अर्धशतक करणारा युवा फलंदाज हा बहुमान मिळवला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *