तुमचं ब्रेकअप झालंय मग सावधान तुम्हालाही येऊ शकतो हार्ट अॅटक, तज्ज्ञांनी केले स्पष्ट – Marathi News | Can person get heart attack after love break up know what experts say detail information in marathi


ब्रेकअप झालं, एखादी जवळची व्यक्ती गमावली किंवा अचानक मोठा धक्का बसला की आपण सहज म्हणतो, “मी दुखावलो गेलोय किंवा माझं हृदय तुटलं, पण ही गोष्ट हलक्यात घेऊ नका. खूप जास्त मानसिक ताण आला तर त्याचा परिणाम थेट हृदयावर होतो. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो किंवा काही वेळा ही परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे लंडनच्या कार्डिओलॉजिस्टने स्पष्ट केले आहे. या आजाराला ब्रोकन हॉर्ट सिंड्रोम असे म्हणतात. हा आजार नेमका काय आहे? तुमच्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊ या…

ब्रोकन हार्ट सिंड्रोम

ब्रोकन हार्ट ही फक्त फिलिंग नसून हृदयाशी संंबंधित गंभीर आजार आहे. ज्यामुळे हृदयविकाराचा बळावतो. या आजारात जवळच्या व्यक्तीला गमावल्याने किंवा कोणती दुख:द घटना घडल्याने हृदय कमजोर होते. आजारी व्यक्ती सतत त्या घडलेल्या गोष्टीच्या विचारात अधिक गुंतत जाते. याचा परिणाम हृदयावर होतो. त्यामुळे हार्ट अॅटक येण्याचे धोका अधिक वाढतो, असे तज्ज्ञ सांगतात.

ब्रेकअपमुळे होतो मृत्यू?

नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याने अनेकदा भविष्यात ब्रेकअप होते आणि याचा परिणाम थेट आरोग्यावर होऊ शकतो .  ब्रेकअपसोबतच जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, विश्वासघात, भावनिक आघात , भीती, तणाव अशी काही कारणेदेखील ब्रोकन हार्ट या सिंड्रोमसाठी कारणीभूत ठरू शकतात.

ब्रोकन हार्ट आणि हॉर्ट अटॅक यांचा संबंध

ब्रोकन हार्ट सिंड्रोम आणि हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे ही जवळपास सारखीच असतात. सतत काही काळ शॉकमध्ये राहिल्याने तणाव वाढत जातो. त्याचा परिणाम हा आहारावर होतो.  त्यामुळे हाता-पायांना मुंग्या येणे, चक्कर येणे यांसारखी लक्षणे दिसतात. दुसरीकडे सामान्यत: हृदयाशी संबंधित काही आजारांमध्ये कोरोनरी आर्टरी किंवा नस ब्ल़ॉक झाल्यामुळे हृदयापर्यंत पुरेसे रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे हार्ट अॅटक येऊ शकतो, असे सांगितले जाते.

तुम्हाला ब्रोकन हार्ट सिंड्रोम आहे का हे तपासून घ्या

बहुतेक वेळा ब्रोकन हार्ट सिड्रोममध्ये छातीत दुखणे, हृदय जोरात धडधडणे, चक्कर येणे, उलट्या येणे किंवा सतत आंबट ढेकर येणे ही लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घेणे फायद्याचे ठरते.

(टीप- वरील स्टोरीतीली माहितीही प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा. आम्ही कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *