‘तारक मेहता’च्या लेकीच्या लग्नात विकी कौशलचीच चर्चा; वरातीचं केलं स्वागत – Marathi News | Vicky kaushal welcomed procession at taarak mehta fame shailesh lodha daughter wedding kumar vishwas also attended


शैलेश लोढा, विकी कौशल, कुमार विश्वासImage Credit source: Instagram

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांच्या घरात सध्या जल्लोषाचं वातावरण आहे. यामागचं कारण म्हणजे त्यांची लाडकी लेक स्वरा लोढाचा विवाहसोहळा. जोधपूरच्या प्रसिद्ध उमेद भवन पॅलेसमध्ये स्वराचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओमधील अभिनेता विकी कौशलच्या उपस्थितीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं आहे. स्वराच्या लग्नात विकी शैलेश यांच्या वतीने विशेष पाहुणा म्हणून हजर होता. लग्नातील हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या व्हिडीओमध्ये विकी कौशल पांढऱ्या रंगाची शेरवानी-जॅकेट आणि काळी पँट अशा स्टायलिश लूकमध्ये दिसत आहे.

शैलेश लोढा त्याचं स्वागत करतात आणि विविध पाहुण्यांशी, कुटुंबीयांशी त्याची ओळख करून देतात. यातील दुसऱ्या क्लिपमध्ये विकी कौशल हा शैलेश यांचा फेटा नीट करताना, वरातीचं स्वागत करताना आणि वधूला मिठी मारून तिचं अभिनंदन करताना दिसत आहे. लग्नाला आलेल्या पाहुण्यांसोबत विकी कौशलनेही पुरेपूर आनंद लुटला. आणखी एका व्हिडीओमध्ये शैलेश लोढा यांचा अत्यंत भावनिक क्षण कैद झाला आहे, ज्यामध्ये ते मुलीला मिठी मारून भावूक होतात. त्यानंतर स्वरा तिच्या आई-वडिलांसोबत आणि आजी-आजोबांसोबत फोटोसाठी पोझ देतानाही दिसते.

पहा व्हिडीओ-

स्वरा लोढाच्या लग्नाला उपस्थित असलेल्या इतर सेलिब्रिटींमध्ये कवी कुमार विश्वास यांचाही समावेश होता. तेसुद्धा शैलेश लोढा यांच्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले होते. योगगुरू बाबा रामदेवसुद्धा लग्नाला उपस्थित होते. लग्नाच्या एक दिवस आधी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा हेदेखील दिसले होते. मात्र या सर्वांत जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी कुठेच दिसले नाहीत. यावरून नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

शैलेश लोढा झाले भावूक

शैलेश लोढा आणि विकी कौशल यांच्यात खूप चांगली मैत्री असल्याचं पहायला मिळतंय. शैलेश यांनी विकीसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, ‘ज्याचा अर्थ प्रचंड लोकप्रियता, अतुलनीय यश आणि सर्वदूर पसरलेली प्रसिद्धी असा होता.. विकी कौशलने हे सर्व कठोर परिश्रम आणि समर्पणाने मिळवलं आहे. तरीही त्याच्या मनाचा मोठेपणा अधिकच वाढला आहे. तो आजही पहिल्या दिवसाप्रमाणेच पाय जमिनीवर ठेवून आहे. हीच गोष्ट त्याला इतरांपासून वेगळं ठरवते. खूप खूप प्रेम विकी.’





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *