Beed News : बीडचे दिवंगत तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अवघ्या दीड महिन्यात फडणवीस सरकारने अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहानुभूती पूर्वक हा निर्णय घेतला आहे.
लातूर-अंबाजोगाई मार्गावर भीषण अपघातात तहसीलदार राकेश गिड्डे यांचे निधन झाले होते.
राकेश गिड्डे यांच्या निधनानंतर पत्नी नेहा यांनी बीडऐवजी सांगली येथे नोकरीसाठी विनंती केली होती
राकेश गिड्डे यांच्या निधनानंतर पत्नी नेहा यांनी बीडऐवजी सांगली येथे नोकरीसाठी विनंती केली होती. विशेष बाब म्हणून नेहा गिड्डेंना सांगली येथे नोकरी देण्याचा निर्णय मंत्री बावनकुळेंनी घेचला आहे. बीड जिल्ह्यातील केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांचे काही दिवसांपूर्वी अपघातात दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पत्नी नेहा गिड्डे यांनी अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने त्यांना सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेत तातडीने समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचे पत्र विभागीय आयुक्त, पुणे यांना पाठविण्यात आले आहे.
लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ 9 एप्रिलला अपघात झाला होता
लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ 9 एप्रिलला सकाळी भीषण कार अपघात झाला होता. यामध्ये केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा (Kej Accident News) जागीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाली. अपघाताची (Kej Accident News) तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला होता.
अपघाताच्या वेळी गिड्डे कारमध्ये एकटेच होते
रेणापूर पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गिड्डे कारमध्ये एकटेच होते. पहाटेच्या सुमारास वेगात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यात गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता.
महत्वाच्या बातम्या:
Kej Accident News: भरधाव कारवरचं नियत्रंण सुटलं; कार पलटी होऊन केजच्या तहसीलदार राकेश गिड्डेंचा जागीच मृत्यू; अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्ह्यात हळहळ
आणखी वाचा