ट्विशा शर्माच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा, बेल्टने वाढवला गुंता; फरार पतीच्या आवळणार मुसक्या? – Marathi News | Twisha Sharma Death Case Big revelation in postmortem report belt increase confusion


Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा हिच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमुळे प्रकरणाचा गुंता अधिक वाढला आहे… पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असं समोर आलं आहे की, ट्विशा हिने स्वतःला संपवण्यासाठी कथितरित्या जिमनास्टिक बेल्टचा वापर केला असवा… तिचा मृतदेह गच्चीत जिम्नॅस्टिक्सच्या बेल्टला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ट्विशाच्या कुटुंबीयांनी दुसऱ्या पोस्टमार्टमसाठी भोपाळ जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या हत्येसंदर्भात एसीपी रजनीश कश्यप म्हणाले, “लुकआऊट नोटीसच्या संदर्भात डीसीपी कार्यालय, भोपाळ आयुक्तालय आणि प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाशी आवश्यक पत्रव्यवहार सुरू करण्यात आला आहे. ही प्रक्रिया सध्या सुरू असून, लवकरच ठोस कारवाई केली जाईल…”

कश्यप पुढे म्हणाले, ‘आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी आमची एसआयटी टीम स्थानीक स्तरावर कार्यरत आहे. तांत्रिक तसेच मानवी स्रोतांकडून माहिती गोळा करण्याचं काम सध्या सुरु आहे.’, दरम्यान, याप्रकरणी, वापरण्यात आलेल्या बेल्टचे रिपोर्ट देखील समोर आले आहे. तो पोलिसांना तपासासाठी पाठवलेला. त्याच बेल्टचा वापर करून, ट्विशाने स्वतःला संपवलं.

रिपोर्टमध्ये देखील ट्विशा हिचा मृत्यू आत्महत्य असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टमच्या वेळी फासासाठी वापरलेला बेल्ट तेथे नव्हता. पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी हा बेल्ट तपास यंत्रणांना दिला होता, त्यानंतर सर्व माहिती समोर आली आहे.

बहिणीने ट्विशा शर्माच्या सासूवर केले गंभीर आरोप…

ट्विशा शर्मा हिची बहीण मिनाक्षी हिने सासू गिरिबाला सिंग यांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. मिनाक्षी म्हणाली, ‘माझी बहीण ड्रग्स घेत नव्हती आणि तिला कोणती मानसिक समस्या देखील नव्हती. काही दिवसांपूर्वी ती भावाच्या लग्नासाठी नोएडा देखील आली होती. ट्विशाच्या खात्यात मुद्दाम पैसे जमा करण्यात आले आणि नंतर काढण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ट्विशा हातात हेडफोन घेऊन, अगदी सामान्यपणे गच्चीवर जातानाही दिसत आहे…’

मिनाक्षी असं देखील म्हणाली की, ‘समर्थ सिंग अत्यंत अहंकारी होता आणि स्वतःला खूप प्रभावशाली समजत होता. आता आम्हाला ट्विशाच्या दुसऱ्या पोस्टमार्टमसाठी परवानगी हवी आहे…’, पोलीस सध्या फरार नवऱ्याच्या शोधात आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *