गिरगावमध्ये वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला पकडलं रंगेहाथ – Marathi News | Marathi Lead Actress Rescued Prostitution Racket Busted In Mumbai Hotel girgaon have links with several celebrities


प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram

मुंबई पोलिसांनी गिरगावमधल्या एका हॉटेलमध्ये चालणाऱ्या वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी यातून दोन अभिनेत्रींची सुटका केली आहे. त्यापैकी एक मराठी चित्रपटांमधील मुख्य अभिनेत्री असल्याचं कळतंय. तर दुसरी बंगाली आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे. या कारवाईदरम्यान सेलिब्रिटींसोबत काम करणारा एक मेकअप आर्टिस्ट असलेला दलालसुद्धा रंगेहाथ पकडला गेला. मुंबई पोलिसांनी या कारवाईबद्दलची माहिती दिली आहे.

कल्याणमध्ये महिला वकिलाच्या पुढाकाराने वेश्या व्यवसाय

दुसरीकडे कल्याण पूर्व भागातील एका नामांकित हॉटेलमध्ये एक ज्येष्ठ महिला वकील काही गरजू पीडित मुलींना हाताशी धरून वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने हा प्रकार उघडकीस आणला असून याप्रकरणी मुख्य सूत्रधार वकील महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

यापूर्वी जानेवारी महिन्यात अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाच्या (AIITD) एका पथकाने नवी मुंबईतील तुर्भे नाका परिसरातील एका लॉजमध्ये चालणाऱ्या अवैध वेश्याव्यवसाय टोळीचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पथकाने घटनास्थळावरून सात महिलांची सुटका केली होती. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी या टोळीत सामील असलेल्या तीन जणांना अटक केली.

तुर्भे नाका इथल्या एका लॉजमध्ये ग्राहकांकडून मोठी रक्कम उकळून महिलाना वेश्याव्यवसायात ढकललं जात होतं. पोलिसांना एका खबऱ्याकडून याबद्दलची माहिती मिळाली होती. त्याची पडताळणी करण्यासाठी पोलिसांनी एक नियोजित मोहीम राबवली होती. या प्लॅननुसार पोलिसांनी लॉजमध्ये एक बनावट ग्राहक पाठवला आणि अवैध कृत्याची खात्री झाल्यावर पथकाने तात्काळ लॉजवर छापा टाकला.

या छाप्यादरम्यान पोलिसांना लॉजच्या खोल्यांमध्ये सात महिला आढळल्या होत्या. या महिलांना वेश्याव्यवसायासाठी तिथे डांबून ठेवण्यात आलं होतं. आरोपी एकमेकांशी संगनमत करून या महिलांच्या राहण्याची सोय करत असत आणि त्यांना ग्राहकांसमोर सादर करून त्यांच्या पसंतीनुसार सौदे ठरवत असत, असं नंतर पोलिसांच्या तपासात उघड झालं होतं. या वेश्याव्यवसायातून मिळालेली रक्कम ते आपापसांत वाटून घेत असत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ग्राहकांकडून गोळा केलेली रक्कमही जप्त केली होती.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *