त्यामागचे कारण सांगताना ते म्हणाले, “कपिलने केवळ मलाच नाही, तर माझ्या कुटुंबाला आणि माझ्या निष्पाप मुलीला या वादात खेचले होते. त्याने माझ्या मुलीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील वक्तव्य केले होते, जे एका बापासाठी कधीही विसरणे शक्य नाही. त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, त्यामुळे मी त्याला आयुष्यभर कधीच माफ करणार नाही.”
