इनफिनिक्स नोट 60 प्रो चा पिनिनफरिना एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत – Marathi News | Infinix Note 60 Pro Pininfarina Edition launched in India; check out its special features and price.


इन्फिनिक्स कंपनीने एप्रिलमध्ये त्यांचे नवीन डिव्हाइस इन्फिनिक्स नोट 60 प्रो सादर केले होते आणि या फोनचे कंपनी आता एक विशेष लिमिटेड एडिशन व्हेरिएंट भारतीय बाजारात सादर केले आहे. इन्फिनिक्स कंपनीने‍ ग्राहकांसाठी इन्फिनिक्स नोट 60 प्रो पिनिनफरिना एडिशन लाँच केला आहे. या नवीनतम स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात तुम्हाला पहिल्यांदाच फोनमध्ये हेल्थ मॉनिटरिंग सेन्सर पाहायला मिळेल. हा सेन्सर ऑक्सिजन, हृदयाचे ठोके आणि तणावाची पातळी यांसारखी माहिती देतो

360-डिग्री एरोस्पेस ग्रेड ॲल्युमिनियम फ्रेमसह लाँच झालेल्या या फोनमध्ये कार्बन फायबरचे मागील पॅनल असेल. हा केवळ सध्याच्या नोट 60 प्रो मधील एक नवीन रंग नाही. या फोनची रचना इटालियन स्टुडिओ पिनिनफरिनाच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे, ज्याने अनेक दशकांपासून अनेक लग्झरी वाहनांना आकार दिला आहे. चला तर मग भारतात लाँच झालेल्या या इनफिनिक्स नोट 60 प्रो पिनिनफरिना एडिशनची किंमत आणि त्याचे खास फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात इनफिनिक्स नोट 60 प्रो पिनिनफरिना एडिशनची किंमत

हा नवीन इन्फिनिक्स फोन 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या एकाच व्हेरिएंटमध्ये येतो. हा फोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 37 हजार 999 रूपयांना सूचीबद्ध करण्यात आला आहे. या किंमतीच्या रेंजमध्ये, हा नवीन इन्फिनिक्स फोन OPPO Reno11 5G, vivo T4 Pro 5G आणि POCO X8 Pro सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

इनफिनिक्स नोट 60 प्रो पिनिनफरिना एडिशनची फीचर्स

डिस्प्ले: तुम्हाला 144Hz रिफ्रेश रेट आणि 1.5K रिझोल्यूशन असलेला 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिला ग्लास 7i चा वापर केला जातो.

चिपसेट: या इन्फिनिक्स स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 7S जेन 4 प्रोसेसर वापरण्यात आला आहे आणि कंपनीने फोन थंड ठेवण्यासाठी 3D आइस कोर VC कूलिंग चेंबर देखील दिला आहे.

कॅमेरा: या नवीन इन्फिनिक्स फोनमध्ये OIS सह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 8-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. समोरच्या बाजूला 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.

बॅटरी: 6500 mAh बॅटरी, 90 W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह, जी 30 W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

विशेष वैशिष्ट्ये: उत्तम आवाजासाठी जेबीएल स्पीकर्स आणि ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स उपलब्ध असतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *