Lock Upp मध्ये मोठा भूकंप! दुसऱ्या आठवड्यात सुनीता आहुजाचा पत्ता कट, कोणता दुसरा स्पर्धक पडला जेलच्या बाहेर? | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

Lock Upp 2 elimination: ९ जुलै रोजी झालेल्या ‘जजमेंट डे’ च्या शूटिंगनंतर जे दोन बडे चेहरे या तुरुंगातून कायमचे बेघर झाले आहेत, त्यांची नावे ऐकून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

News18
News18

मुंबई: सध्या सोशल मीडिया आणि टीव्ही विश्वात ‘लॉक अप: सच या सजा’ या वादग्रस्त रिॲलिटी शोची तुफान चर्चा सुरू आहे. दररोज नवनवे राडे आणि ट्विस्ट देणाऱ्या या शोमध्ये या आठवड्यात एक मोठा भूकंप झाला आहे. घरातून एकाच वेळी दोन स्पर्धकांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. ९ जुलै रोजी झालेल्या ‘जजमेंट डे’ च्या शूटिंगनंतर जे दोन बडे चेहरे या तुरुंगातून कायमचे बेघर झाले आहेत, त्यांची नावे ऐकून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे.

सुनीता आहुजाचा खेळ खल्लास

घरातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आठवड्यात डबल एलिमिनेशनचा बळी ठरलेले दोन लोकप्रिय चेहरे म्हणजे अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा आणि सोशल मीडिया स्टार रियाझ अली. या दोघांनाही शोमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. यातील सुनीता आहुजा यांचे बाहेर पडणे प्रेक्षकांसाठी सर्वाधिक धक्कादायक मानले जात आहे. कारण, गेल्या काही दिवसांत त्यांनी आपल्या बेधडक विधानांनी आणि भावनिक खेळीने संपूर्ण शो लाईमलाईटमध्ये ठेवला होता.

गोविंदाची एन्ट्री ठरली निष्फळ

मजेशीर गोष्ट अशी की, याच आठवड्यात सुनीता आहुजा यांना धीर देण्यासाठी आणि खंबीर पाठिंबा देण्यासाठी बॉलीवूडचा ‘हिरो नंबर वन’ गोविंदा खिशात गोळी घेऊन थेट शोमध्ये पोहोचला होता. गोविंदाने मंचावर येऊन सुनीतासोबत प्रचंड धम्माल-मस्ती केली आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. गोविंदाच्या या धमाकेदार एन्ट्रीमुळे सुनीता आहुजा या आठवड्यात सुरक्षित राहतील, असा अंदाज त्यांचे चाहते लावत होते. मात्र, वोट्यच्या गणितात कमी पडल्यामुळे शेवटी सुनीता यांना या तुरुंगातून बाहेर पडावेच लागले. गोविंदाची जादूही त्याच्या पत्नीला एलिमिनेशनपासून वाचवू शकली नाही, अशीच चर्चा आता रंगली आहे.

खेळ होणार आणखीनच टॉक्सिक

सुनीता आहुजा आणि रियाझ अली यांच्यासारखे दोन तगडे आणि लोकप्रिय स्पर्धक अचानक बाहेर पडल्यामुळे ‘लॉक अप २’ च्या घरातील संपूर्ण समीकरण बदलले आहे. या दोन मोठ्या विकेट्स पडल्यानंतर आता उरलेल्या १३ स्पर्धकांमध्ये जेलमध्ये टिकून राहण्यासाठी आणखीनच जीवघेणी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या डबल इव्हिक्शनच्या जबरदस्त ट्विस्टमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/

Lock Upp मध्ये मोठा भूकंप! दुसऱ्या आठवड्यात सुनीता आहुजाचा पत्ता कट, कोणता दुसरा स्पर्धक पडला जेलच्या बाहेर?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *