सुनिताचे रिक्षाचालक राहुलसोबत अनैतिक संबंध, पतीने विचारताच केले तीन तुकडे; नवी मुंबईच्या मर्डर मिस्ट्रीने खळबळ! – Marathi News | Navi mumbai wife kills his husband for rickshaw driver lover extra marital affair leads to death


Wife Kills Husband : नवी मुंबईतून एक धक्कादायक व हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. प्रियकारसाठी स्वतःच्या पतीचे तीन तुकडे केल्याची धक्कादायक मर्डर मिस्ट्रीने येथे एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना ऐरोलीत घडली असून तब्बल अकरा महिन्यांनी या मर्डर मिस्ट्रीचे खरे सत्य समोर आले आहे. पोलिसांनी सखोल तपास केल्यानंतर पत्नीनेच पतीचे तीन तुकडे केल्याची बाब उघड झाली आहे.

तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या

ऐरोलीत एका महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. तिने पतीचे तीन तुकडे करत विविध ठिकाणी फेकून दिले होते. तिने तब्बल अकरा महिने मर्डर पचवला होता. मात्र आता अखेर तिचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत. सुनिता कुशवाह (40) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (30) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. तर बलीराम सूर्यनाथ कुशवाह (50) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी अनैतिक संबंध

दाखल तक्रारीनुसार मयत बलीराम कुशवाह हे ऐरोलीच्या यादव नगर परिसरात आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. मात्र सुनिता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी अनैतिक संबंध होते. याला पतीचा विरोध होता. त्यामुळे पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट सुनिता आणि राहुल यांनी रचला आणि बलीराम यांना कायमचे संपवले.

पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन…

जवळपास आठ महिन्यांनंतर बलीराम यांचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला. पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली. त्यांच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर कसून चौकशी केली असता, दोघांनीही थरारक हत्येची कबुली दिली. दरम्यान ही घटना समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मयत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *