Rohit Sharma: तर तशी मजा राहिली नाही…अखेर रोहितने रिटायरमेंटच्या चर्चांवर मौन सोडलं, जे बोलला ते तुमच्याही हृदयाला भिडेल, Video Viral – Marathi News | Rohit shrama break silenece on his retirement after hit century against england


भारत आणि इंग्लंडमध्ये टी-20 मालिका आणि वनडे मालिका पार पडली. दोन्ही मालिका इंग्लंडने जिंकला. भारतीय संघाची कामगिरी मागील काही महिन्यात चांगली पाहायला मिळाली नाही. संघात वारंवार होणारे अनेक बदलांमुळे आता निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागत नाही. अशातच काही अनुभवी खेळाडूही निवृत्त करण्याच्या तयारीत बीसीसीआय असंही म्हटलं जात होत. विशेषत: रोहित शर्मा निवृत्त होणार अशी जोरदार चर्चा रंगलेली दिसली. लॉर्ड्सच्या मैदानावर रोहितने फक्त शतक ठोकले नाही तर त्यासोबत अनेकांची तोंडही बंद केली आहेत. रोहितच्या शतकी खेळीनंतर आता त्याच्या निवृत्तीच्या चर्चांवरही पूर्णविराम बसला आहे. रोहितने आता निवृत्तीच्या चर्चांवर आपले परखड मत मांडले आहे.

रोहितने म्हटले आहे की, “जोपर्यंत मी खेळत राहील, तोपर्यंत हे सुरूच राहील. सध्या माझे लक्ष चांगला क्रिकेट खेळण्यावर आहे, मैदानावर बॅटने धावा करणे हे माझे काम आहे. माझ्या देशाचे आणि संघाचे प्रतिनिधित्व करणे हे माझे काम आहे. जेव्हापासून मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हापासून मला हेच करण्यास सांगितले गेले आहे आणि मी ते करत राहीन. माझ्या पदार्पणापासून माझ्या निवृत्तीबद्दल आणि फॉर्मबद्दल चर्चा होत आहे आणि जोपर्यंत मी येथे क्रिकेट खेळत राहीन, तोपर्यंत या चर्चा सुरूच राहतील. त्यामुळे, या गोष्टींचा माझ्यावर फारसा परिणाम होत नाही.”

रोहित पुढे म्हणाला की, मी मैदानावर काय करतो आणि संघाच्या विजयासाठी मी किती योगदान देऊ शकतो, हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. सध्या माझं संपूर्ण लक्ष त्यावरच आहे. बाहेरच्या गदारोळाबद्दल बोलायचं झालं तर, त्याला राहू द्या, कारण जर गदारोळच नसेल, तर मजा राहणार नाही. माझं काम मैदानावर खेळणं आहे आणि बाहेरच्या लोकांचं काम अफवा पसरवणं आहे, मी याकडे असंच पाहतो.”

रोहितने कोहलीसोबतच्या बॉन्डवरही सांगितले. तो म्हणाला की, “आम्ही आमच्या संपूर्ण कारकिर्दीत एकत्र खेळलो आहोत. त्यामुळे विराटसोबत मैदानावर असणं खूप छान वाटतं. आमच्या अनेक उत्तम भागीदारी झाल्या आहेत आणि एकत्र फलंदाजी करताना नेहमीच मजा येते. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतो. मैदानावर नवीन कल्पनांची देवाणघेवाण करणे आणि संघासाठी आपण आणखी काय चांगलं करू शकतो याचा विचार करणे, हा नेहमीच एक अद्भुत अनुभव असतो.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *