Who Is 33 Year Old Yudhvir Ahlawat: वय 33, पण साकारली 16 वर्षांच्या मुलाची भूमिका; सैफ अली खानच्या सीरिजमधल्या ‘या’ अभिनेत्यानं IMDb वर शाहरुख-ऐश्वर्यालाही टाकलं मागे


Who Is 33 Year Old Yudhvir Ahlawat: सैफ अली खान (Saif Ali Khan) स्टारर ‘कर्तव्य’ सध्या नेटफ्लिक्सवर (Netflix) टॉप 10 मध्ये ट्रेंड (Netflix Top 10 Movies) करतेय. ज्यामध्ये तगडी स्टारकास्ट असली तरीसुद्धा हरपालची भूमिका साकारणारा अभिनेता युधवीर अहलावत (Actor Yudhvir Ahlawat) सध्या चर्चेत आहे. अनेकजण त्याच्या चेहऱ्यावरचे निरागस भाव आणि तरुण दिसण्यामुळे अनेकजण त्याला चाईल्ड आर्टिस्ट (Child Artist) समजतात. पण, प्रत्यक्षात मात्र तो 33 वर्षांचा अभिनेता असून, यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये झळकला आहे. विशेष म्हणजे, ‘कर्तव्य’च्या (Kartavya) यशानंतर युधवीर ऑनलाईन सर्वाधिक सर्च करण्यात आलेला अभिनेता ठरला. त्यानं IMDb रँकिंगमध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि थलपती विजय (Thalapathy Vijay) यांसारख्या सुपरस्टार्सनाही मागे टाकल्याची चर्चा रंगली आहे. 

सर्वाधिक सर्च करण्यात आलेला अभिनेता ठरला युधवीर 

नेटफ्लिक्स सीरीज ‘कर्तव्य’मध्ये सैफ अली खानसोबत हरपालच्या भूमिकेत दिसल्यानंतर युधवीर अहलावत ऑनलाईन सर्वाधिक सर्च करण्यात आलेला अभिनेता ठरला आहे. अनेक युजर्सचा शो पाहिल्यानंतर हाच गैरसमज झालाय की, युधवीर चाईल्ड आर्टिस्ट आहे, ज्याचं कारण त्याचा ऑन स्क्रीन अपीरियन्स आहे. 

33 वर्षांचा युधवीर अहलावत मोस्ट पॉप्युलर अभिनेता

चाहत्यांमधील संभ्रम दूर करत, आम्ही हे निश्चितपणे सांगू शकतो की, युधवीर अहलावत 33 वर्षांचा आहे. तो जवळपास एका दशकभरापासून रंगभूमी आणि सिनेसृष्टीत कार्यरत आहे. याशिवाय, ‘कर्तव्य’ (Kartavya) सिनेमातील अभिनेत्यानं आता IMDb च्या लोकप्रियतेच्या क्रमवारीत शाहरुख खान, थलपती विजय, ज्युनियर एनटीआर आणि ऐश्वर्या राय यांनाही मागे टाकलं आहे. युद्धवीर अचानकपणे ‘सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या’ अभिनेत्यांपैकी एक म्हणून समोर आला आहे.

युधवीर अहलावत याच्याबाबत थोडंस…

‘कर्तव्य’ सिनेमामुळे चर्चेत येण्यापूर्वी, युद्धवीर अहलावत ‘सांड की आँख’, ‘शमशेरा’, बॉबी देओल आणि विक्रांत मेस्सी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘लव्ह हॉस्टेल’ या सिनेमांमध्ये झळकला होता. सिनेमांमधील कामाव्यतिरिक्त, त्यानं रंगभूमीवरील नाटकांमध्येही अभिनय केला आहे. युधवीर हरियाणातील ‘शेरिया’ गावाचा रहिवासी आहे. त्याचे वडील, ज्ञान सिंह अहलावत, यांनी सीमा सुरक्षा दलात (BSF) सेवा बजावली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

2 hour 38 minute Film Kara Beat Dhurandhar: ‘धुरंधर’चा रेकॉर्ड मोडला! 4 दिवसांतच नंबर वन ठरली 2 तास 38 मिनिटांची ‘ही’ फिल्म, पाहिलीय का तुम्ही?

ABP माझाच्या बातम्या LIVE… 

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *