ATM होणार हद्दपार ? दोन वर्षात 44% कमी झाला Debit Card कार्डचा वापर, काय कारण ? – Marathi News | Are ATM Cards on Their Way Out? Debit Card Usage Drops by 44% in Two Years, What Is the Reason?


दशकांपासून पैसे काढण्यासाठी भारतीय सर्वात विश्वासार्ह माध्यम डेबिट कार्डला वापरत आले आहेत. लोक एटीएममधून पैसे काढण्यासाठी डेबिट कार्डला सुविधाजनक मानत आले आहेत. परंतू आरबीआयची नविन आकडेवारी पाहिली तर डेबिट कार्ड वापरणाऱ्या लोकांच्या संख्येत कमतरता आली आहे. नव्या आकडेवारीप्रमाणे गेल्या दोन वर्षात डेबिट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत ४४ टक्के कमतरता आली आहे.

2 वर्षात किती घसरण झाली ?

ATM मधून पैसे काढणाऱ्या लोकांच्या संख्येत कमतरता आली आहे. केंद्रीय बँक आरबीआयच्या FY2026 च्या वार्षिक रिपोर्टनुसार डेबिट कार्ड देवाण-घेवाण 2023-24 मध्ये 22,860 लाखांवरुन घटून 2024-25 मध्ये 16,120 लाखांवर आणि 2025-26 मध्ये 12,802 लाखांवर राहिली आहे. हे आकडे सांगतात की गेल्या दोन वर्षांत सुमारे 44 टक्के घसरण झाली आहे.

का झाला डेबिट कार्डचा वापर कमी

एटीएममध्ये कमतरता येण्यामागे कारण यूनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे UPI च्या वापरात झालेली वाढ आहे. आकडेवारीनुसार आर्थिक वर्षे 2023-24 UPI ची घेवाण देवाण 13,11,295 लाखांनी वाढून 24,16,169 लाख झाली आहे.ही सुमारे 84 टक्के वाढ झाली आहे. आता लोक छोट्या-छोट्या वस्तू खरेदी करण्यासाठी उदा. किराणा, भाजी, वा अन्य गरजेचे सामान खरेदीपासून ते वीज आणि पाण्याचे बिल देखील युपीआयद्वारे करत आहेत. आता युपीआय पेमेंट हे डिफॉल्ट पेमेंट बनले आहे. यामुळे आता डेबिट कार्डला स्वाईप वा टॅप करण्याची गरज कमी पाहायला मिळत आहे.

याशिवाय अनेक बँका अशाही आहेत ज्या आता मोबाईल बँकींग ऐप आणि UPI-enabled platformsच्या माध्यमातून विना कार्ड रोख रक्कम काढण्याची सुविधा देत आहेत. ज्यामुळे फिजिकल डेबिट कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही.

क्रेडिट कार्डाचा वापर देखील वाढला

डेबिट कार्ड सर्वसाधारणपणे सेव्हींग अकाऊंट सोबत डिफॉल्ट केले गेले आहेत. तसेच कोणत्याही अर्जा शिवाय दिले जात आहेत. तसे क्रेडिट कार्ड सोबत होत नाही. अहवालानुसार लोक डेबिट कार्डाच्या तुलनेत क्रेडिट कार्डचा उपयोग वाढवत आहेत. एप्रिल २०२६ मध्ये क्रेडिट कार्डवरुन देवाण-घेवाणीच्या प्रमाणात 23 टक्के वाढ झाली आहे. तर लेनदेनच्या मुल्यात यात काळात 7 टक्के वाढ झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *