Last Updated:
व्हॉट्सअॅपवर आता अनोळखी लोकांसोबत चॅट करण्यासाठी तुम्हाला त्यांना मोबाईल नंबर देण्याची गरज नसणार आहे. व्हॉट्सअॅप आता तुमच्यासाठी व्हॉट्सअॅप यूझरनेम फीचर घेणं आलंय. ज्यामुळे आता तुमची प्रायव्हसी टिकून राहील.
मुंबई : व्हॉट्सअॅप हे आपल्या यूझर्ससाठी नवनवीन अपडेट आणत असते. आता व्हॉट्सअॅप एक जबरदस्त फीचर घेऊन येत आहेत. ज्यात तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बोलण्यासाठी मोबाईल नंबर देण्याची गरज असणार नाही. तुम्ही यूझरनेमच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर त्या व्यक्तीच्या संपर्कात राहू शकता. ज्यामुळे तुमची प्रायव्हसी कायम राहील. व्हॉट्सअॅपचे नवीन सीईओ कुणाल शाह यांनी यूझर नेम फीचरची घोषणा केली आहे. म्हणजेच आता तुम्ही तुमचा नंबर न सांगता दुसऱ्यांशी बोलू शकता. कंपनीने 29 जून रोजी ग्लोबल लेव्हलवर हे रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. सीईओने सर्वांना आपलं आवडतं नाव लगेच रिझर्व्ह करण्याचा सल्ला दिला आहे.
सर्वात आधी आपल्या व्हॉट्सअॅपला लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट करा. अॅपच्या आत सेटिंग ऑप्शनमध्ये जा. यानंतर अकाउंट सेक्शनवर टॅप करा. येथे तुम्हाला यूझरनेमचा ऑप्शन दिसेल. आपला आवडीचा आणि उपलब्ध नाव निवडून कंफर्म करा.
तुमचं यूझरनेम जास्तीत जास्त 35 कॅरेक्टर्सचं असू शकतं. हे तुम्ही बदलूही शकता. तुमच्या जुन्या चॅट्सवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. ब्लॉक किंवा एंट-टू-एंट एन्क्रिप्शनसारखे फीचर्स पहिल्यासारखेच काम करत राहतील.
हे फीचर हळुहळू सर्व मोबाईल डिव्हाइसेजसाठी रोलआउट होत आहे. हे तुमच्या रीजन म्हणजेच क्षेत्रात उपलब्ध होईल, तेव्हा तुम्हाला अॅपमध्ये एक नोटिफिकेशन मिळेल.
कंपनीचा दावा आहे की, अजिबात धोका नाही. हे पूर्णपणे एक प्रायव्हसी फस्ट फीचर आहे. जे तुमची सुरक्षितता लक्षात घेऊन डिझाइन केलंय.
नाही, मेटाने स्पष्ट केलंय की, सोशल मीडिया हँडलसारखं नसेल. व्हॉट्सअॅपवर कोणतीही पब्लिक डायरेक्ट्री नसेल जिथे कोणी तुमचं नाव सर्च करू शकेल. ज्यावेळी एखाद्याला तुमचं अचूक यूझरनेम माहिती नसेल, तो तुम्हाला मेसज पाठवू शकणार नाही.
सुरक्षा मजबूत करण्यासाठी यात ‘यूझरनेम की’ नावाचं ऑप्शनल फीचर दिलंय. ज्यावेली एखादा पहिल्यांदा तुमच्या यूझरनेमच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करेल, तेव्हा त्याला ती खास की टाकावी लागेल. यूझर ती की कधीही बदलू शकतो. जेणेकरुन एखादा अनोळखी व्यक्ती त्यांना त्रास देऊ शकणार नाही.
हो, पण ते यूझरनेम व्हॉट्सअॅपव आधीच कोणी घेतलेलं नसावं. तेव्हाच तुम्ही ते क्लेम करू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअॅपला त्याच अकाउंट सेंटरमध्ये जोडावं लागेल, जिथे तुमचं फेसबुक किंवा इंस्टाग्राम अकाउंट आहे.
फेसबुक किंवा इंस्टाग्रामचं यूझरनेम व्हॉट्सअॅपवर कसं क्लेम करावं?
- व्हॉट्सअॅप ओपन करा आणि More क्लिक करुन सेटिंगमध्ये जा.
- आपल्या प्रोफाइल फोटोच्या आजुबाजूच्या भागांवर टॅप करा.
- ‘Create username’ वर टॅप करा.
- यानंतर ‘Use Instagram username’ किंवा ‘Use Facebook username’ चा ऑप्शन निवडा.
- आपलं अकाउंट्स एकाच अकाउंट सेंटरमध्ये जोडण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या निर्देशांचं पालन करा.
- लिंक होताच तुमचं उपलब्ध यूझरनेम WhatsApp साठी क्लेम होईल.
नाही हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही हवं तेव्हा अकाउंट Accounts Center वरुन हटवू शकता.
Mumbai,Maharashtra
