Aaditya Thackeray : आता, तुमच्या आरत्याच करायच्या का? सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशानंतर आदित्य ठाकरें संतापले, म्हणाले…


Aaditya Thackeray : गेले चार दिवस आणि त्याआधीचे 4 वर्ष आम्ही पाहातोय जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतंय, तेच स्वतःच्या स्वार्थासाठी निघून जाताय. त्यामुळे यात काही आश्चर्य नाही. धक्का बसण्यासारखं नाही. वरळी असेल किंवा शिवडी असेल हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. कोणी येण्याने किंवा जाण्याने धक्का बसत नाही. आदित्य ठाकरेंशी ते बोलूच नाही शकत असं नाही. प्रभाग समिती असेल. बेस्ट, शिवसेनेत उपनेत्या पद आहे, युनियन अध्यक्ष पद असेल. रोज येणं जाणं आणि संवाद होता. मग प्रश्न पडतो कि अजून तुम्हाला काय पाहिजे? बाकी लोक ओरडतात तसं भेटत नव्हतो का? तर असं पण नाहीये, सोबतच असायचो, मग अजून किती ओरबडणार आणि आम्ही अजून काय करायला हवं? आता रोज काय तुमच्या आरत्याच करायच्या का? असा संतप्त सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics news)

ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी शिंदेसेनेकडून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला साथ दिल्याचे समोर आल्यावर आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) यावर प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. (Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026)

Aaditya Thackeray on Devendra Fadnavis : हे ऑपरेशन टायगर नाही, तर हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस

नुकताच पुण्याच्या दौऱ्यादरम्यान चर्चा झाली होती. त्यावेळी ते म्हणाले होते पुढे काय होणार? संविधान बदलणार आहे? खासदार गेलेत, आज हे गेलेत, आपली मंदिरं लुटत आहेत. यावर अनेक वेळ चर्चा झाली. पण त्यावेळी त्यांच्या मनात नैराश्य होतंच. असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मात्र प्रश्न कायम राहतो, कि हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कसे बसू शकता? संविधान बदलणाऱ्यांसोबत कसे बसू शकता? बारीक अभ्यास केल्यानंतर लक्ष्यात आलं कि हे ऑपरेशन टायगर नाही, तर हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. मात्र कोणी आल्या गेल्याने कोणाला फरक पडत नाही. वरळीतून ते उमेदवार असतील तर काही फरक पडणार नाही. असेही आदित्य ठाकरे म्हणाले. सचिन अहिरांना आम्ही काय कमी केलं?, अहिरांच्या भावाला बीएमसी दिली, मुलीला प्रभाग समिती दिली, त्यांना बेस्टचं अध्यक्षपद दिलं. रोज भेटत होतो, आता काय अहिरांसारख्यांची रोज काय आरती करायची? असेही आदित्य ठाकरे म्हणाले

Aaditya Thackeray : जी योग्य कारवाई असेल ती केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही

सचिन अहिर यांना उपसभापती पदावर बसवलं. का नाही भाजपवाला बसवला? हे उपरे बसवता आहात तुम्ही? जी योग्य कारवाई असेल ती केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपचे कार्यकर्ते घरदार सोडून गेलेले आहेत. त्यांना का पदं दिली जात नाही? आम्ही ज्यांना ज्यांना शब्द दिला तो पाळला. तुम्ही निष्ठा पाळता आहात की नाही हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही वचनाला जगू नाही शकला, हा तुमचा प्रश्न आहे. मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर पंख छाटण्याचे काम सुरु आहे. शिवराजसिह चौहान यांचे पंख छाटण्याचे काम झाले. अशात, फडणवीस यांचा देखील पंख छाटले जातायत हे दिसतंय. संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळत होते, ते काढून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *