Sachin Ahir: शिंदे गटात जाताच सचिन अहिर ठाकरेंवर बरसले, पहिल्या प्रतिक्रियेत थेट हल्लाबोल; म्हणाले सोबत होतो तेव्हा… – Marathi News | After leaving shiv sena ubt and joining eknath shinde led shiv sena sachin ahir first reaction


विधान परिषदचे आमदार सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला रामराम ठोकला आहे. त्यांनी आज एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांचा आभार मानतो. कोळश्यातून हिऱ्याची चमक दिसते. आणि तो हिरा जवळ करण्याची संधी येते त्यातून विश्व घडतं. शिंदेंनी मला उपसभापती या पदावर मान दिला. तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री असताना काम केलं. सरकारमध्ये राहून काम केलं पाहिजे. पण विधिमंडळातूनही काम करण्याचं काम मी त्यांच्या नेतृत्वात करणार आहे. उपसभापतीपदासाठी अनेक लोकांची नावे घेता येतील. रासू गवई, वसंत डावखरे, माणिकराव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांनी उपसभापती म्हणून मोठं काम केलं. तीच गरीमा मी ठेवणार आहे. जिथे पक्ष बळकट नाही. तिथे काम करणार आहे. ग्रामीण भागात जाऊन काम करणार आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *