IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीचा झंझावात कुठे पाहता येणार, आणि किती वाजता सामना सुरु होणार? पाहा Schedule – Marathi News | India vs england t20 series live streaming sony sports network tv and jio hot star mobile


भारत आणि आयर्लंड यांच्यात मालिका रंगली जी भारतीय संघाने गमावली. भारतीय संघाने प्रथमच आयर्लंडविरुद्ध सामना आणि मालिका गमावली आहे. आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाची कामगिरी पाहता याच संघाने सलग दोनदा विश्वचषक जिंकला असावा वाटत नाही. आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे. आयर्लंडविरुद्ध कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची सुरुवात निराशाजनक झाली आहे. आयर्लंडविरुद्ध दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने गमावल्यानंतर, आता त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दरम्यान, भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. पाच सामन्यांची टी-20 मालिका 1 जुलैपासून सुरू होत आहे. सामने सुरू होण्यापूर्वी, टीव्ही आणि मोबाईलवर सामने थेट कसे पाहायचे हे जाणून घ्या…

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. टी-20 मालिका 1 जुलैपासून सुरू होत असून, यामध्ये पाच सामने खेळले जाणार आहेत. तुम्ही हे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनल्सवर टीव्हीवर थेट पाहू शकता. मात्र, जर तुम्हाला मोबाईलवर सामने पाहायचे असतील, तर तुम्हाला जिओ हॉटस्टारवर जावे लागेल. तुम्ही स्टार स्पोर्ट्सद्वारे किंवा तुमच्या मोबाईलवरील सोनी लिव्ह ॲपवर टीव्हीवर सामने पाहू शकणार नाही. मात्र, जर तुमच्याकडे डीडी फ्री डिश कनेक्शन असेल, तर तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर सामन्यांचा थेट आनंद घेऊ शकता. आता पहिला, दुसरा आणि तिसरा टी-20 सामना रात्री 10.00 वाजता रंगणार आहे. दुसरा आणि पाचवा सामना हा संध्याकाळी 7:00 वाजता रंगणार आहे. आयर्लंडविरुद्ध मालिका गमावल्यामुळे वैभवला इंग्लंडविरुद्ध संधी मिळू शकते.

भारतीय संघासमोर इंग्लंडकडून एक मोठे आव्हान आहे. या मालिकेत नव्याने निवड झालेला कर्णधार श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, तर दुसरीकडे इंग्लंडचे नेतृत्व हॅरी ब्रूक करत आहे, जो बऱ्याच काळापासून संघाचे नेतृत्व करत असून चांगली कामगिरी करत आहे. हे निश्चित दिसत आहे की भारतीय संघाच्या अनुभवी खेळाडूंना इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर एका कठीण आणि महत्त्वपूर्ण आव्हानाला सामोरे जावे लागेल.

भारतीय क्रिकेट संघ: श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, हर्षित राणा, ईशान किशन, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, सूर्यांश शेडगे, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.

इंग्लंड क्रिकेट संघ: हॅरी ब्रुक, जोफ्रा आर्चर, सोनी बेकर, टॉम बेंटन, जेकब बेथेल, जोस बटलर, जेम्स कोल्स, जॉर्डन कॉक्स, सॅम करन, लियाम डॉसन, विल जॅक्स, सादिक महमूद, आदिल रशीद, रेहान अहमद, फिल सॉल्ट, जोश टंग, ल्यूक वूड.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *