Welcome to the jungle Box Office Collection Day 5: मल्टीस्टारर ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) या सिनेमानं उत्तम कामगिरी करत बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगली सुरुवात केली आहे. विकेंड नंतर विकडेजमध्येही या सिनेमाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. अवघ्या काही दिवसात या कॉमेडी ड्रामा सिनेमानं आपली बॉक्स ऑफिसवर पकड मजबूत केली असून, मंगळवारीही या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घौडदौड पाहायला मिळाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं मंडे टेस्टमध्ये टॉप केले असून, मंगळवारी या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन केले आहे. प्रदर्शनाच्या 5 व्या दिवशी या सिनेमानं नेमके किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमानं प्रदर्शनाच्या 5 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? (Welcome to the jungle box office collection)
अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. कॉमेडी ड्रामा या फिल्मला फॅमिली ऑडियन्सकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. विकेंडमध्ये या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. तर विकडेजमध्येही या सिनेमाची जादू कमी झाली नसल्याचं पाहायला मिळालं.
विकेंडच्या तुलनेत विकडेजमध्ये या सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. पण तरीही हा सिनेमा कोट्यवधींच्या घरात कमाई करत आहे. फिल्मच्या कलेक्शनबाबत बोलायचं झाल्यास पेड प्रीव्ह्यूमध्ये या सिनेमानं 3.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, ओपनिंग डेला या सिनेमानं 15.25 कोटींचे कलेक्शन केले आहे.
विकेंडमध्ये या सिनेमाच्या कमाईत धमाकेदार वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी या सिनेमाने 20 कोटींचे तर, रविवारी 24.75 कोटींचे कलेक्शन केले. विकेंडच्या तुलनेत सोमवारी या सिनेमाच्या कमाईत घट झाली. सोमवारी या सिनेमानं 8.50 कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमानं प्रदर्शनाच्या 5व्या दिवशी म्हणजेच मंगळवारी 9.25 कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, भारतात या सिनेमानं 5 दिवसांत एकूण 81.50 कोटींचे कलेक्शन केले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा