Weekly Horoscope: धनु, मकर राशीच्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, सप्टेंबरचा नवा आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..


Weekly Horoscope 21 To 27 September 2026: ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर (September 2026) नवीन आठवडा आजपासून सुरु झाला आहे. हा नवीन आठवडा खरंतर सर्वच राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक वातावरण राहण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. जुन्या गैरसमजांवर संवादातून तोडगा काढता येईल.

करिअर (Career) – नवीन आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कल्पना आणि काम करण्याची पद्धत वरिष्ठांच्या लक्षात येण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्क किंवा कामाच्या संधी मिळू शकतात. मात्र, कोणतेही आश्वासन देण्यापूर्वी सर्व बाबी तपासा.. 

आर्थिक स्थिती (Wealth) – आर्थिक बाबतीत आठवडा समाधानकारक राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधण्याची इच्छा निर्माण होईल. अचानक खर्च होण्याची शक्यता असल्याने बचतीकडे लक्ष द्या. मोठी गुंतवणूक करताना योग्य माहिती घेऊनच निर्णय घ्या.

आरोग्य (Health) – या आठवड्यात धावपळ आणि कामाचा ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. नियमित झोप आणि संतुलित आहार राखणे महत्त्वाचे ठरेल. व्यायाम किंवा चालण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका..

मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) – मकर राशीच्या लोकांना जोडीदारासोबतच्या नात्यात स्थैर्य राहण्याची शक्यता आहे. मात्र, कामाच्या व्यापामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता येणार नाही. त्यामुळे संवादासाठी वेळ काढणे आवश्यक आहे. अविवाहित व्यक्तींना कुटुंब किंवा मित्रांच्या माध्यमातून नवीन स्थळ किंवा ओळख मिळू शकते.. 

करिअर (Career) – करिअरच्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा ठरू शकतो. प्रलंबित कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी प्रयत्न सुरू ठेवावेत. व्यवसायात घेतलेले निर्णय भविष्यात परिणामकारक ठरू शकतात..

आर्थिक स्थिती (Wealth) – या आठवड्यात आर्थिक स्थिती स्थिर ठेवण्यासाठी खर्चाचे योग्य नियोजन करा. घरगुती किंवा कौटुंबिक कारणांसाठी काही अतिरिक्त खर्च होऊ शकतो. जुनी देणी किंवा आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी हा काळ उपयोगी ठरू शकतो. बचतीला प्राधान्य देणे फायदेशीर राहील.

आरोग्य (Health) – आरोग्याच्या बाबतीत कामाच्या व्यापामुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. झोपेची वेळ नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा. मानसिक ताण कमी करण्यासाठी विश्रांती आणि आवडीच्या गोष्टींसाठी वेळ द्या. कोणतीही आरोग्याची लक्षणे जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घ्या.

हेही वाचा :

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! आजपासून सप्टेंबरचा चौथा आठवडा गेमचेंजर, पैसा, नोकरी. साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *