Weather Update: अरबी समुद्रात घडतंय भयंकर, वादळ वाढवणार टेन्शन, मुंबईत कधी येणार मान्सून? | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

मान्सून वेगानं पुढे, महाराष्ट्रात अनुकूल स्थिती, मुंबई कोकणात 10 ते 12 जूनदरम्यान मुसळधार पाऊस, उत्तरेकडील भाग, मराठवाडा, विदर्भात पावसाला विलंब

वादळ येणार?
वादळ येणार?

मान्सून वेगानं पुढे सरकत आहे. महाराष्ट्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याची माहिती स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिली आहे. अपेक्षेपेक्षा जास्त वेगानं तो पुढे सरकत आहे.

उत्तरेकडे मात्र मान्सून पुढे सरकण्यासाठी अडचणी येताना दिसत आहेत. उत्तरेकडील भागांमध्ये मान्सूनची वाटचाल धीम्या गतीनं सुरू आहे. अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. केरळ आणि महाराष्ट्रातच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्याची टर्फ लाइन महाराष्ट्राला घासून पुढे उत्तरेकडे जात आहे.

गोव्याच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर हे सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे. ते कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर चक्रीवादळातही रुपांतरीत होण्याचा धोका आहे. मात्र ते पुढच्या काही दिवसांमध्ये समजू शकतं. डिप डिप्रेशन समुद्रात आतल्या बाजूला किंवा गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. हे होण्यासाठी १५ जून उजाडण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि कोकणता चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरात 10 जूनच्या आसपास मान्सून धडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यासाठी वातावरणही अनुकूल असून त्यामध्ये कोणताही सध्या बदल होणार नाही. सुरुवातीला चांगला पाऊस राहील.

महाराष्ट्रात उत्तरेकडील राज्यांमध्ये १५ जूनपर्यंत पावसाचा अंदाज फारसा नाही. मान्सून पूर्व पाऊस, आणि ऊन असा ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळेल. मात्र कोकणात मुसळधार पाऊस ११ आणि १२ जूनपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहील. मराठवाडा आणि विदर्भात मात्र पावसाची वाट पाहावी लागणार आहे. मध्य महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाच्या रिमझिम सरी बरसणार आहेत. स्कायमेटने मान्सूनचा दिलेला सुरुवातीचा अंदाज खरा ठरला. 4 जून रोजी केरळमध्ये मान्सून आला. तर 6 जून रोजी महाराष्ट्रात आला. आता वादळाचा अंदाज खरा ठरला तर मान्सूनच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *