Virat Kohli on Ajinkya Rahane: ‘तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..’ निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट


Virat Kohli on Ajinkya Rahane: टीम इंडियाचा फलंदाज अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यने भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळलेल्या रहाणेने इन्स्टावर व्हिडिओ संदेशातून हा निर्णय जाहीर केला. व्हिडिओमध्ये, 38 वर्षीय रहाणे भावूक होऊन म्हणाला की, आता पुढे जाण्याची हीच योग्य वेळ आहे. विराट कोहलीने सोशल मीडिया पोस्टद्वारे रहाणेच्या कारकिर्दीचे अभिनंदन केले.

तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार

टीम इंडियाचा माजी कॅप्टन विराट कोहलीने रहाणेच्या निवृत्तीबद्दल अभिनंदन केले. त्याने लिहिले की, “जिंक्स, मित्रा, तुझ्या अद्भुत कारकिर्दीबद्दल अभिनंदन. तू भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान दिले आहेस.” कोहलीने पुढे लिहिले, “तू तुझ्या प्रवासाचा अभिमान बाळगू शकतोस. तू स्लिप्समधील सर्वात विश्वासार्ह खेळाडू आणि कसोटी क्रिकेटमधील माझा आवडता फलंदाजीचा साथीदार राहिला आहेस. मी तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.” देव तुला सदैव आशीर्वाद देवो.

रहाणेचे कर्णधारपद अविस्मरणीय  

अजिंक्य रहाणेच्या कारकिर्दीतील सर्वात गौरवशाली अध्याय 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लिहिला गेला. ॲडलेड कसोटीत भारताचा संघ 36 धावांवर सर्वबाद झाल्यानंतर आणि विराट कोहली परतल्यानंतर, रहाणेने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. त्याने मेलबर्नमध्ये शतक झळकावून भारताला विजय मिळवून दिला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. रहाणेच्या कर्णधारपदाखाली, भारताने गब्बा येथे ऑस्ट्रेलियाला मालिकेत 2-1 ने पराभूत करून एक ऐतिहासिक विजय नोंदवला आणि त्यांचा 32 वर्षांचा अपराजित विक्रम मोडला.

पदार्पण 2011 मध्ये, शेवटची कसोटी 2023 मध्ये खेळली

रहाणेने 2011 मध्ये भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने आपला पहिला एकदिवसीय सामना 3 सप्टेंबर 2011 रोजी चेस्टर-ले-स्ट्रीट येथे इंग्लंडविरुद्ध आणि आपले टी20 आंतरराष्ट्रीय पदार्पण 31 ऑगस्ट 2011 रोजी मँचेस्टर येथे इंग्लंडविरुद्ध खेळले. रहाणेने आपला पहिला कसोटी सामना 22 मार्च 2013 रोजी दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. त्याचा शेवटचा कसोटी सामना 20-24 जुलै 2023 दरम्यान पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झाला. त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना 16 फेब्रुवारी 2018 रोजी सेंचुरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि त्याचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 28 ऑगस्ट 2016 रोजी लॉडरहिल येथे वेस्ट इंडिजविरुद्ध होता.

6 कसोटी सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आणि 4 जिंकले

रहाणेने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवले. कसोटी क्रिकेटमध्ये, रहाणेने 6 सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले. यापैकी संघाने 4 सामने जिंकले, तर 2 कसोटी सामने अनिर्णित राहिले. एकदिवसीय सामन्यांमध्ये, त्याने 3 सामन्यांमध्ये संघाचे कर्णधारपद भूषवले आणि भारताने तिन्ही सामने जिंकले. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये, रहाणेने 2 सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले, ज्यात 1 सामना जिंकला आणि 1 गमावला.

कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवले 

गेल्यावर्षी रहाणेने कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्याने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 212 सामन्यांमध्ये 125.60 च्या स्ट्राइक रेटने आणि 30.15 च्या सरासरीने 5,367 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर दोन शतके आणि 35 अर्धशतके आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *