Tech-Neck Problem Health News: मोबाईल वापरणाऱ्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फोनच्या वाढत्या वापरामुळे तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना टेक-नेकची (तंत्रज्ञानामुळे होणारी मानदुखी) समस्या (Tech-Neck Problem) उद्भवू शकते. आपण मोबाईल स्क्रोल करताना किंवा कॉम्प्यूटर बघताना मान समोरच्या बाजुला झुकवतो तेव्हा मानेवर 22 किलोचा भार पडतो. ज्यामुळे फोन वापरणाऱ्या अनेकांना वाकण्याची, कुबड येण्याची किंवा मनगटांवर ताण येण्याची समस्या जाणवते. त्याकडे दुर्लक्ष केल्यास मणक्याला कायमचं नुकसान होऊ शकतं असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
काही गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेचीही गरज भासल्याचं समोर आलं. मोबाईलच्या स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश हा फक्त डोळेच नाही तर झोपेची गुणवत्ताही खराब करतो. शिवाय फोनच्या अतिवापरामुळे मानेला सुरकुत्या पडणं, चेहरा वयस्कर दिसणं , त्वचेच्या रंगात बदल होण्यासारख्याही समस्या होऊ शकतात. त्यामुळे मोबाईलचा मर्यादित वापर करणं, मोबाईलसारखी उपकरणं पाहताना मान सरळ ठेवणं गरजेचं आहे. याशिवाय दर 20 मिनिटांनी थोडा ब्रेक घेतल्यासही टेक-नेकची समस्या टाळता येऊ शकते. (Health News)
लहान वयातच पाठीच्या कण्याचं ‘डिस्क डिजनरेशन’ आणि स्पॉन्डिलायसिसचा त्रास सुरू होण्याच धोका- (Tech-Neck Problem)
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या आयुष्याशी जोडली गेलेली वस्तू म्हणजे मोबाईल. मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळे, मानसिकता यावर होणाऱ्या परिणामांची चर्चा सातत्यानं होत असते. मात्र आता एका नवा ‘साथीचा रोग’ गॅझेट्सच्या अतिवापरामुळे जगभरात पसरतोय. ‘टेक नेक’ किंवा ‘फोन बॉडी’ असं या नव्या आजाराचं नाव आहे. आपल्या डोक्याचं नैसर्गिक वजन सर्वसाधारणपणे 4.5 ते 5 किलो असतं…मात्र, फोनमध्ये पाहताना आपली मान 45 अंशाच्या कोनात पुढे झुकते. त्यामुळे मानेच्या मणक्यावर तब्बल 22 किलोचा अतीरिक्त भार पडतो. परिणामी लहान वयातच पाठीच्या कण्याचं ‘डिस्क डिजनरेशन’ आणि स्पॉन्डिलायसिसचा त्रास सुरू होण्याच धोका असतो.
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन’ या आरोग्यविषयक नियतकालिकात 25 जून 2025 मध्ये एक शोधनिबंध प्रकाशित झाला होता. स्मार्टफोनचं व्यसन असलेल्या 13 ते 15 वयोगटातील मुलांच्या मणक्यात गंभीर विकृती येण्याची सर्वाधिक शक्यता असल्याचं यात म्हटलं होतं. हे गंभीर आजार जडवून घ्यायचे नसतील, तर मोबाईल, लॅपटॉप वापरता काही तत्थ्य पाळावीच लागतील.
टेकनेक हा गंभीर आजार जडवून घ्यायचा नसेल तर काय करावं? (Tech-Neck Problem Health News)
- मोबाईल हा नेहमी डोळ्यांच्या पातळीवर पकडा…
- खाली मान घालून स्क्रीन पाहण्याऐवजी डोळ्यांच्या थेट समोर ठेवा…
- दर 20 मिनिटांनी ब्रेक घ्या…
- 20 फूट लांब असलेल्या गोष्टीकडे…
- 20 सेकंद एकटक बघा…
- काम करताना मान, खांदे आणि हाताचं हलकं स्ट्रेचिंग अधूनमधून करत राहा…
- अंधारात फोन वापरणं टाळा…
- मोबाईल, टॅबमध्ये ब्लू-लाईट फिल्टर वापरा…
- तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे, आरोग्याचा बळी देण्यासाठी नाही…
- ‘टेक नेक’सारख्या गंभीर आजारापासून वाचायचं असेल, तर फोनचा अतिवापर थांबवणं…
- आणि योग्य जीवनशैलीचा अवलंब करणं आवश्यक करणं ही काळाची गरज आहे…
…तर वेळीच सावध व्हा- (Tech-Neck Problem Health News)
- तुमच्या मानेच्या मागच्या बाजूला तीव्र वेदना आणि जडपणा जाणवत असेल…
- मान, खांदे आणि पाठीचा मधल्या भागात कुबड आलं असेल…
- हाता-पायांना आणि बोटांना मुंग्या येत असतील किंवा बधिरता येत असेल…
- डोकेदुखी, डोळ्यांवर ताण आणि निद्रानाशाची समस्या असेल किंवा कमी वयात मानेवर सुरकुत्या पडत असतील…
- डबल चिन असेल… तर वेळीच सावध व्हा…
मोबाईल स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश केवळ दृष्टीच खराब करत नाही, तर झोपेची गुणवत्ताही बिघडवतो- (Mobile Screen Time)
मोबाईल स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश केवळ दृष्टीच खराब करत नाही, तर झोपेची गुणवत्ताही बिघडवतो. “तो शरीराच्या सर्केडियन रिदममध्ये (जैविक लय) व्यत्यय आणतो, विशेषतः जेव्हा अंधाऱ्या खोलीत फोन वापरला जातो. जेव्हा मेंदूला रेटिनामधून संकेत मिळतात, तेव्हा निळा प्रकाश मेलाटोनिनच्या निर्मितीला दाबून टाकतो आणि त्यामुळे भयंकर डोकेदुखी होते,” असे ते सांगतात. तसेच, फोन धरण्याच्या पद्धतीचाही हाताच्या सांध्यांवर परिणाम होऊ शकतो, असेही ते पुढे सांगतात. यामुळे कार्पल टनेल सिंड्रोम होऊ शकतो, ज्यामुळे हात आणि बोटांमध्ये बधिरता, मुंग्या येणे आणि वेदना होतात. मनगटाच्या चुकीच्या स्थितीमुळे नसांचे कार्य बिघडू शकते. इथेच सर्व संपत नाही. मान पुढे झुकल्यामुळे, फोनच्या अतिवापरामुळे त्वचेवरही परिणाम होतो. मानेवर आडव्या सुरकुत्या पडतात; चेहरा चेहऱ्यापेक्षा खूप जास्त वयस्कर दिसू लागतो. स्क्रीनच्या निळ्या प्रकाशामुळेही काही मदत होत नाही. त्वचेच्या रंगाच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
ही बातमीही वाचा:
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
Calculate The Age Through Age Calculator