Shubman Gill: वेस्ट इंडिजला झोंबणार मिर्च्या, गिलने दोन शब्दात विडिंजच्या जखमेवर मीठ चोळलं – Marathi News | Shubman gill post after hit double century against west indies ind vs wi 2nd odi


IND vs WI ODI: गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात, भारतीय कर्णधार शुभमन गिलने आपल्या बॅटने असा इतिहास रचला आहे, जो क्रिकेट जग वर्षानुवर्षे लक्षात ठेवेल. कॅरिबियन संघाने ठेवलेले ४०६ धावांचे विशाल लक्ष्य गाठताना, गिलने केवळ १३३ चेंडूंमध्ये २६ चौकार आणि ८ षटकारांसह २२३ धावांची नाबाद धमाकेदार खेळी केली. भारताने ८ गडी राखून एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग पूर्ण केला, जो जागतिक क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग देखील आहे. या विजयानंतर गिलने एक पोस्ट शेअर केली ज्यामुळे वेस्ट इंडिजला मिर्च्या झोंबल्या असतील,

या ऐतिहासिक विजयानंतर आणि आपल्या विक्रमी द्विशतकानंतर, गिलने सोशल मीडियावर आपल्या फलंदाजीचे फोटो शेअर केले आणि त्याला ‘४०६? कूल.’ अशी बिनधास्त आणि आक्रमक शैलीत कॅप्शन दिले. या पोस्टनंतर नक्कीच वेस्ट इंडिजला मिर्च्या झोंबल्या असतील. कारण वेस्ट इंडिजने ४०६ करुनही भारतीय संघाने जो दमदार परफॉमन्स केला. गिलने ४०६ कूल असं म्हणतं वेस्ट इंडिजला डिवचले आहे. गिलच्या म्हणण्यानुसार ४०६ ही आम्ही सहज करु शकतो.

एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा तो फलंदाज ठरला. याबाबतीत, त्याने ग्लेन मॅक्सवेलचा २०१* मागे टाकले. धावांचा पाठलाग करताना द्विशतक झळकावणारा गिल हा मॅक्सवेलनंतर जगातील दुसरा फलंदाज आहे. इतकेच नव्हे तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वीरेंद्र सेहवागने (२१९ धावा) केलेला विक्रम मोडला. गिल (२) हा रोहित शर्मानंतर (३) एकदिवसीय सामन्यांमध्ये एकापेक्षा जास्त द्विशतके झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला.

गिलने काल जी खेळी खेळली त्याचे सर्वांनीच कौतुक केले. गिलची कालची खेळी दिल जिंकणारीच होती. इतकी दुखापत होऊनही त्याने क्रीझ काही सोडली नाही. तो शेवटपर्यंत लढत राहिला. अनेकदा मैदानात पडला पण त्याने खेळी सुरुच ठेवली. तो न थांबता खेळत राहिला आणि भारतीय संघाला जिंकवून दिलं.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *